मुंबई, 29 मे : खतांच्या वाढलेल्या किंमतीमुळे (fertilizer rate) राज्यात खतांच्या बाबतीत रोज नवीन घटना समोर येत आहेत. राज्यात खतांचा तुटवडा असल्याची अफवा राज्यातील शेतकऱ्यांमध्ये आहे. (farmer) यामुळे राज्यातील शेतकरी संभ्रमात आहे. यावर कृषी विभागाकडून (agriculture department) खुलासा करण्यात आला आहे. येत्या खरिपासाठी खतांची टंचाई (kharif fertilizer rate) मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याची अफवा आहे. मात्र राज्यात खते मुबलक असून, टंचाई नसल्याची माहिती कृषी खात्याकडून देण्यात आली आहे.
राज्यातील शेतकरी 62 लाख टन खताची खरेदी दरवर्षी केली जाते. यामध्ये रब्बी पिकासाठी 27 लाख टन, तर खरिपात जवळपास 35 लाख टन खतांची खरेदी राज्य शासनाकडून केली जात असते. दरम्यान मागच्या 50 वर्षात राज्याची शेती नगदी व बागायती पिकांकडे वळाल्यामुळे खतांच्या वापरात कित्येक पटींनी वाढ झाली आहे. याचबरोबर 1980 च्या खरीप हंगामात प्रतिहेक्टरी 21.4 किलो खताचा वापर शेतकरी करत असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. आता तेच प्रमाण मागच्या खरिपात प्रतिहेक्टरी 138.60 किलोपर्यंत आले आहे.
हे ही वाचा : ‘शेजाऱ्याच्या घरात जरी पाळणा हलला तरी पेढे वाटायचे’, सदाभाऊंची राष्ट्रवादीवर खोचक टीका
खतांचा मागील तीन वर्षांतील वापर, बदलती पीक पद्धती, उपलब्ध सिंचन क्षमता, जिल्ह्यांची मागणी आणि जमीन सुपीकता निर्देशांक अशा पाच मुद्द्यांचा विचार करून खताचा पुरवठा निश्चित केला जातो. राज्याने यंदा 52 लाख टन खताची मागणी केली होती. मात्र राज्यातील खतांची शेतकऱ्यांकडून होणारी सरासरी खरेदी 42 ते 45 लाख टनांच्या आसपास आहे. त्यामुळे यंदा एकूण 45.20 लाख टन खतांचा पुरवठा मंजूर करण्यात आलेला आहे.
यंदाच्या हंगामात शेतकरी 45 लाख टनांच्या आसपास खतांची खरेदी करतील. मात्र, रब्बी हंगामातील 12 लाख टनापेक्षा जास्त खते पडून आहेत. त्यामुळे एकूण 57 लाख टनांहून अधिक खते बाजारात उपलब्ध असतील. त्यामुळे टंचाई होणार नसल्याची माहिती कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यात आली.
हे ही वाचा : अटल भूजल योजना नेमकी आहे तरी काय? या जिल्ह्याने घेतला सर्वाधिक फायदा
खतांच्या दर जैसे थे परंतु भेसळीचे प्रमाण वाढले
खतांच्या वाढत्या किंमती लक्षात घेता केंद्र सरकारने (central government) खतांच्या किंमतींवर अंकूश ठेवण्यासाठी रासायनिक खतांच्या किंमतींवर अनुदान देत खतांचे दर जैसे थे ठेवले. दरम्यान मागच्या 1 वर्षात खतांच्या किंमतीमध्ये 25 टक्क्यांनी वाढ झाली. परंतु खतांच्या वाढत्या किंमतीबरोबर शेतकऱ्याला भेसळयुक्त खतांमध्ये फसवले जात असल्याचे दिसून येत आहे. रासायनिक खतांमध्ये (chemical fertilizers) भेसळ (Adulterated fertilizers) करून कमी दर ठेवत त्याची विक्री केली जात असल्याचे शेतकऱ्यांकडून (farmer) संताप व्यक्त करण्यात येत आहे.