Home /News /maharashtra /

Breaking : ठाण्यात लॉकडाऊन वाढवला; पण हॉटस्पॉटकरिताच असतील कडक नियम

Breaking : ठाण्यात लॉकडाऊन वाढवला; पण हॉटस्पॉटकरिताच असतील कडक नियम

ठाणे

ठाणे

Coronavirus चा प्रादुर्भाव पाहता ठाण्यात 31 जुलैपर्यंत Lockdown मध्ये वाढ करण्यात आली आहे. पण हॉटस्पॉटपुरतेच लॉकडाऊनचे नियम कडक असतील. उर्वरित ठाण्यात काय राहणार बंद, काय सुरू?

  ठाणे, 18 जुलै : ठाण्यातला Coronavirus चा फैलाव अजूनही आटोक्यात येत नसल्यामुळे लॉकडाऊनच्या (Lockdown) कालावधीत वाढ करण्यात आली आहे. ठाण्यात केवळ हॉटस्पॉट असलेल्या विभागांमध्ये पूर्णतः लॉकडाऊनचे आदेश ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिले आहे. इतर ठिकाणी राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे लॉक डाऊन असेल. म्हणजेच हॉटस्पॉट किंवा Containment zone वगळता उर्वरित ठाण्यातले व्यवहार 2 जुलैपूर्वी होते तसे खुले होतील. ठाण्यात सम आणि विषम तारखेच्या नियमाप्रमाणे रस्त्याच्या एकेका बाजूची दुकानं एकआड एक दिवस उघडतील. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दुकानं उघडी ठेवायला परवानगी आहे. पण कंटेन्मेंट झोन किंवा हॉटस्पॉट असलेल्या भागात मात्र कडक लॉकडाऊन असेल. तिथे केवळ अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तूच मिळू शकतील. हॉटस्पॉटमध्ये प्रवेशाला प्रतिबंध असेल. ठाण्यात काय आहेत आदेश? हॉटस्पॉट वगळता सर्व ठिकाणी मिशन बिगीन अगेन अंतर्गत नियम लागू हॉट स्पॉट असलेल्या ठिकाणी 31 जुलैपर्यंत पूर्णतः लॉकडाऊन. उद्या संध्याकाळनंतर नवीन आदेशाची अंमलबजावणी काय राहणार बंद काय सुरू? प्रतिबंधित क्षेत्रांत आणि हॉटस्पॉटमध्ये फक्त औषधं आणि जीवनावश्यक वस्तू उर्वरित ठाण्यात सम विषम तारखेनुसार रस्त्याच्या एकाच बाजूची दुकानं उघडणार सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत दुकानं उघडी ठेवायला परवानगी कोरोनाव्हायरसचा मोठा धोका मुंबई महापालिकेबाहेर असणाऱ्या क्षेत्रात वाढलेला आहे. MMR म्हणजेच मुंबई महानगर क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे (Thane), कल्याण-डोंबवली (KDMC), मीरा भाईंदर (mira bhayandar), भिवंडी, उल्हासनगर या महापालिका क्षेत्रांमध्ये आणि आसपासच्या मोठ्या उपनगरांमध्ये प्रचंड वेगाने Covid चे रुग्ण वाढत आहेत. ठाणे शहरातही रुग्ण दुप्पट व्हायचा काळ (doubling rate) मुंबईच्या मानाने खूप कमी आहे. मुंबईत डबलिंग रेट 52 दिवसांचा आहे, तर ठाण्यात फक्त 20 दिवसात रुग्णसंख्या दुप्पट होते आहे. मुंबईच्या लोकसंख्येच्या मानाने तिथली साथ आटोक्यात आहे, असं म्हणता येईल पण ठाण्यातला धोका मोठ्या प्रमाणात वाढतो आहे.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:अरुंधती रानडे जोशी
  First published:

  Tags: Lockdown

  पुढील बातम्या