प्रणाली कापसे/ मुंबई, 12 जुलै : ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांच्या बंगल्यात साप निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा साप संजय राऊत यांच्या बंगल्याच्या समोरच्या भागात एका ताडपत्रीच्या खाली लपून बसला होता. वेळीच सर्पमित्राला बोलावून सापाला पकडण्यात आलं आहे. वेळीच साप पकडला गेला आहे. पावसाळ्यात साप सापडल्याच्या आणि चावल्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. दरम्यान कोणालाही हानी झालेली नाही.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांच्या बंगल्यात साप निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. #SanjayRaut #snake #News18Lokmat pic.twitter.com/4sn3lep6eB
— News18Lokmat (@News18lokmat) July 12, 2023
जाहिरात
व्हि़डीओमध्ये दिसत आहे की, सर्पमित्राने जेव्हा सापाला पकडलं तेव्हा स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी साप प्रयत्न करीत होता. जोरजोरात झटकेही देत होता. बातमी अपडेट होत आहे…
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.