जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आता कुठे आहे ते भाजपचे प्रवक्ते? आदित्य ठाकरेंची माफी मागा, शिवसेना नेत्याने भाजपला सुनावलं

आता कुठे आहे ते भाजपचे प्रवक्ते? आदित्य ठाकरेंची माफी मागा, शिवसेना नेत्याने भाजपला सुनावलं

आता कुठे आहे ते भाजपचे प्रवक्ते? आदित्य ठाकरेंची माफी मागा, शिवसेना नेत्याने भाजपला सुनावलं

दिशा सालियन मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. दिशाचा मृत्यू हा अपघाती झाल्याचं सीबीआयनं स्पष्ट केलं. यावरून आता ठाकरे गटाचे नेते सचिन आहिर यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई,  23 नोव्हेंबर : दिशा सालियन मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. दिशाचा मृत्यू हा अपघाती झाल्याचं सीबीआयनं स्पष्ट केलं.  दारूच्या नशेत दिशा सालियन हिचा तोल गेल्यानं पडून तिचा मृत्यू झाल्याचं सीबीआयने म्हटलं आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा दिशा सालियन प्रकरणावरून राजकारण तापलं असून, ठाकरे गटाचे नेते सचिन आहिर यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे.  निर्लज्जपणाला सीमा नसते हेच यातून दिसते, असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे. नेमकं काय म्हटलं अहिर यांनी?  निर्लज्जपणाला सीमा नसते हेच यातून दिसते. वैयक्तिकरित्या बदनाम करण्याचे काम केलं गेलं. आदित्य ठाकरेंना बदनाम केलं गेलं.  आता कुठे आहेत ते भाजपचे प्रवक्ते? असा सवाल अहिर यांनी केला आहे. तसेच आमची मागणी आहे की बदनाम करणाऱ्यांनी माफी मागावी. वैयक्तिक स्तरावर बदनामी करणाऱ्यांना ही चपराक आहे.  शाहरूख खानच्या मुलाच्या वेळीही असाच प्रकार झाला होता. राज्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोपही अहिर यांनी केला आहे. हेही वाचा :   महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा पंडित नेहरूंमुळेच, मुनगंटीवारांचा दावा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांव र प्रतिक्रिया   तसेच त्यांनी यावेळी बोलताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या वक्तव्यावर देखील संताप व्यक्त केला आहे. बेळगावचा सीमाप्रश्न बाकी असताना असं बोलण्याची त्यांची हिंमत कशी होते? अशी भूमिका घेतल्यास राज्या राज्यात प्रश्न निर्माण होतील. त्यांच्या राज्यातील लोक इकडं राहतात. त्यांचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा ईशारा देतानाच भाजपने अशा लोकांना थांबवायला हवं, असं सचिन अहिर यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात