मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा पंडित नेहरूंमुळेच, मुनगंटीवारांचा दावा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा पंडित नेहरूंमुळेच, मुनगंटीवारांचा दावा

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद ही पंडित जवाहरालाल नेहरू यांची देण आहे. असं वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ajay Deshpande

मुंबई, 23 नोव्हेंबर 2022 :  कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र, कर्नाटक सीमावाद पेटण्याची शक्यता आहे. बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांवर दावा केला आहे. जतमधील 40 गावांच्या ठरावाचा महाराष्ट्रानं गांभीर्यानं विचार करावा असं बोम्मई यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे बोम्मई यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद ही पंडित जवाहरालाल नेहरू यांची देण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस आता आक्रमक होण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हटलं मुनगंटीवार यांनी? 

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद ही पंडित जवाहरालाल नेहरू यांची देण आहे. मात्र सीमावाद प्रश्न हा सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे. त्यामुळे कोणत्याही ग्रामपंचायतने जरी ठराव केला असला तरी काहीही फरक पडणार नाही. निर्णय सर्वोच्च न्यायालय देणार आहे. कर्नाटक मधील अनेक ग्रामपंचायती आहेत, ज्यांना महाराष्ट्रात यायचं आहे. मग त्यांचं काय? असा सवालही मुनगंटीवार यांनी केला आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा काय आहे दावा? 

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याच्या 40 गावांवर दावा केला आहे.  पाण्याच्या मुद्यावरून सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील 40 गावांना कर्नाटकात सामील व्हायचं असल्याचा गौप्यस्फोट कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी आता या 40 गावांच्या ठरावाचा महाराष्ट्रानं गांभीर्यानं विचार करावा असं म्हटलं आहे.

वाद पेटणार? 

महाराष्ट आणि कर्नाटक सीमाप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शिंदे सरकारने एका समितीची स्थापना केली आहे. या समितीची स्थापना झाल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा सीमा वाद पेटण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: BJP, Karnataka, Shiv sena, Sudhir mungantiwar, Uddhav Thackeray