मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /धुळ्यात मद्यपी टँकर चालकाचा धूडगूस; अनेक वाहनांना उडवलं, मोठं नुकसान

धुळ्यात मद्यपी टँकर चालकाचा धूडगूस; अनेक वाहनांना उडवलं, मोठं नुकसान

धुळ्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात रात्री एका मद्यपी टॅंकर चालकाने चांगलाच धूडगूस घातला आहे. या टँकर चालकाने शहरातील अनेक वाहनांना उडवलं.

धुळ्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात रात्री एका मद्यपी टॅंकर चालकाने चांगलाच धूडगूस घातला आहे. या टँकर चालकाने शहरातील अनेक वाहनांना उडवलं.

धुळ्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात रात्री एका मद्यपी टॅंकर चालकाने चांगलाच धूडगूस घातला आहे. या टँकर चालकाने शहरातील अनेक वाहनांना उडवलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Dhule, India

धुळे, 8 जानेवारी :  धुळ्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात रात्री एका मद्यपी टॅंकर चालकाने चांगलाच धूडगूस घातला आहे. या टँकर चालकाने शहरातील अनेक वाहनांना उडवलं. या घटनेमध्ये अनेक वाहनचालक जखमी झाले आहेत. शहरातील फाशीपूल ते संतोषी माता चौकादरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी प्रसंगावधान राखत या टँकर चालकाला वेळीच थांबवल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. पोलिसांनी या टँकर चालकाला ताब्यात घेतले असून, त्याचे नाव राजेंद्रसिंग सकट असल्याची माहिती समोर येत आहे.

टँकर चालक दारूच्या नशेत  

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी रात्री एका मद्यपी टँकर चालकाने अनेक वाहनांना उडवले. ही घटना शहरातील फाशीपूल ते संतोषी माता चौकादरम्यान घडली. राजेंद्रसिंग सकट असं या टँकरचालकाचं नाव आहे. राजेंद्रसिंग हा आपले टँकर घेऊन गुजरातकडे जात होता. मात्र तो दारूच्या नशेत असल्यानं त्याने धुळे शहरातील  फाशीपूल ते संतोषी माता चौकादरम्यान अनेक वाहनांना उडवलं. या घटनेत काही वाहनचालक जखमी झाले आहेत. पोलिसांकडून या टँकरचालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.

हेही वाचा :  भीषण अपघातातून तरुण बचावला, मात्र काही क्षणात दुसरं संकट कोसळलं अन् गेला जीव; हृदय पिळवटून टाकणारी घटना

..तर झाला असता मोठा अनर्थ 

या टँकरचालकाला वेळीच रोखण्यात पोलिसांना यश आलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या टँकर चालकाने तोपर्यंत अनेक वाहनांना उडवले होते. या घटनेत अनेक वाहनचालक जखमी झाले आहेत. पोलिसांनी या टँकर चालकाला ताब्यात घेतले असून, चौकशी सुरू असल्याची माहिती दिली.

First published:

Tags: Dhule