जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / तहसिलदाराला पैशाचा मोह सुटेना, दीड लाखांची लाच स्वीकारताना अटक!

तहसिलदाराला पैशाचा मोह सुटेना, दीड लाखांची लाच स्वीकारताना अटक!

 वाळूचा धंदा सुरू ठेवण्यासाठी तहसीलदाराने लाच मागितल्याचा प्रकार समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे

वाळूचा धंदा सुरू ठेवण्यासाठी तहसीलदाराने लाच मागितल्याचा प्रकार समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे

वाळूचा धंदा सुरू ठेवण्यासाठी तहसीलदाराने लाच मागितल्याचा प्रकार समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

लातूर, 04 जून :  वाळूचा धंदा सुरू ठेवण्यासाठी चक्क तहसिलदाराने महिना 30 हजार रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात घडला आहे. तब्बल दीड लाखांची लाच घेताना तहसीलदाराच्या एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ( anti corruption bureau) अटक करण्यात आली आहे. निलंगा तालुक्यात वाळूचा धंदा सुरू ठेवण्यासाठी तहसीलदाराने लाच मागितल्याचा प्रकार समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. तहसिलदार गणेश जाधव (tehsildar ganesh jadhav ) आणि एक एजंट रमेश मोगेरगे यांना अटक करण्यात आली आहे. तहसीलदार गणेश जाधव याने आपल्या एजंटच्या मदतीने तक्रारदार दाराकडून वाळूच्या तीन ट्रक नियमितपणे चालवू देण्यासाठी आणि वाळूच्या ट्रकवर या पुढे कारवाई न करण्यासाठी पैसे मागितले होते.  यासाठी प्रती ट्रक 30,000/- रूपये प्रमाणे दोन ट्रकचे 60,000/- रूपये प्रति महिने असा व्यवहार ठरला होता.  तीन महिन्याचे 1,80,000/- रूपये झाले होते.  प्रत्यक्ष लाच मागणी करून तडजोडी अंती  1,50,000 रुपयांवर ठरलं होतं. ( रतलाममध्ये जन्मलेल्या बाळाला पाहून डॉक्टरही चकित; एलियनसारखं दिसतं बाळ ) त्यानंतर या तहसीलदाराने  एजंट रमेश मोगेरगे याच्याकडे पैसे देण्याचे सांगितले होते. त्या प्रमाणे तक्रादाराने रमेश मोगेरगे याना निलंगा येथे तहसीलदाराच्या घरासमोर बोलावले.  तिथे  1,50,000/- रूपयांची रक्कम देत असताना अँटी करप्शन ब्युरोने रंगेहाथ अटक केली. त्यानंतर तहसीलदार गणेश जाधवला  अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस सुरू आहे. सरपंच, पोलीस पाटलाला 50 हजार रुपयांची लाच घेताना अटक दरम्यान, जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी मुदतवाढ दिल्यानंतर ग्रामपंचायतीच्या ना-हरकत प्रमाण पत्रासाठी 50 हजारांची लाच स्वीकारताना भंडारा  तालुक्यातील नवरगाव येथील सरपंच व पोलीस पाटलाला भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडल्याची घटना घडली आहे. 42 वर्षीय सरपंच रवींद्र कवडू आजबले व 53 वर्षीय पोलीस पाटील रामकृष्ण धर्माजी आजबले अशी लाच घेणाऱ्यांची नावे आहेत. ( ‘या’ गावात एकाच दिवशी कापले 100 केक, सामूहिक झाली बड्डे पार्टी ) भंडारा तालुक्यातील नवरगाव येथे गौण खनिज खाण असून तक्रारदाराने जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांकडून एक वर्षासाठी लिजवर केली होती. मुदतवाढ घेतली. ग्रामपंचायतीचे ना-हरकत प्रमाणपत्र घेतल्याशिवाय खोदकाम करता येणार नाही, अशी धमकी सरपंच रवींद्र आजबले व पोलीस पाटील रामकृष्ण आजबले यांनी दिली. तसंच साठ हजार रुपये लाचेची मागणी केली. यावरून तक्रारदाराने भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. खात्री करून सायंकाळी नवरगाव येथे सापळा रचला असता सरपंच रवींद्र आजबले यांनी 50 हजार रुपये स्वीकारले आहे. त्यावरून त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले. आता लोकसेवकच भष्ट्राचाराच्या यादीत आल्याने सामान्याचे प्रश्न कोण सोडवणार हाच प्रश्न निर्माण झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात