जाहिरात
मराठी बातम्या / देश / रतलाममध्ये जन्मलेल्या बाळाला पाहून डॉक्टरही चकित; एलियनसारखं दिसतं बाळ

रतलाममध्ये जन्मलेल्या बाळाला पाहून डॉक्टरही चकित; एलियनसारखं दिसतं बाळ

रतलाममध्ये जन्मलेल्या बाळाला पाहून डॉक्टरही चकित; एलियनसारखं दिसतं बाळ

मध्य प्रदेशमधील रतलामच्या शासकीय रुग्णालयात एका नवजात शिशूच्या जन्मानंतर डॉक्टरांसह सर्वजण चकित झाले आहेत.

    भोपाळ, 4 जून : एखाद्या व्यक्तीचा चेहरा, रंग कसा असावा हे त्या व्यक्तीच्या हातात नसतं. निसर्ग त्याला ज्या अवस्थेत जन्माला घालतो तसाच तो असणार असं सगळेच मानतात. लहान बाळाचा चेहरा, अवयव हे ते जन्माला येताना कधीकधी अविकसित असतात नंतर विकसित होतात. पण एलियनसारखं बाळ जन्माला आल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? मग ही बातमी वाचा. मध्य प्रदेशमधील रतलामच्या शासकीय रुग्णालयात एका नवजात शिशूच्या जन्मानंतर डॉक्टरांसह सर्वजण चकित झाले आहेत. कारण जन्मलेलं बाळ परग्रहावरील (Alien) प्राणी एलियनसारखं दिसत असून, त्या बाळाची प्रकृती अतिशय नाजूक आहे. त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ‘झी न्यूज हिंदी’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. रतलामच्या शासकीय महिला व बाल आरोग्य विभागात (Mother and Child Health) महिलेची प्रसूती झाली. एलियनसारख्या दिसणाऱ्या बाळाला रतलामच्या बडावदा येथील साजिदा नावाच्या महिलेने जन्म दिला. वास्तविक पाहता बाळाने 9 महिने पूर्ण झाल्यानंतर जन्म घेतला. बाळ जन्माला आलं तेव्हा त्याला पाहून उपस्थित सर्वच जण चकित झाले. जन्मजात विकृती असल्याने बाळाची अशी अवस्था झाल्याचे अतिदक्षता विभागाचे ( Intensive Care Unit) प्रमुख डॉ. नावेद कुरेशी म्हणाले. लाखांमध्ये एखादं मूल अशाप्रकारे जन्मतं. त्या बाळाचे शरीरावरील कातडेही विकसित झाले नसल्याने शरीरातील सर्व शिरा (Veins) स्पष्ट दिसतात. कातडं नसल्याने त्याचे डोळे, ओठ सूजलेल्या स्थितीत आहेत. ते बाळ मुलगी आहे की मुलगा याचाही अद्याप उलगडा झालेला नाही. ( ‘राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना हात तर लावून दाखवा’, नाना पटोलेंचा धमकीवजा इशारा ) अनुवंशिक आजार असण्याची शक्यता पाहता क्षणी हे बाळ एलियनसारखं वाटत आहे. पण हा अनुवंशिक आजार असल्याची शक्यता डॉक्टर व्यक्त करत आहेत. वैद्यकीय परिभाषेत याला अशा प्रकारच्या मुलांना कोलोडियन बेबी (Collodion Baby) म्हटलं जातं. हा अनुवंशिक प्रकारचा आजार असून, गर्भधारणेच्या वेळी बाळाचं कातडं विकसित होत नाहीत आणि त्याच्या अवयवांवर सूज येते तसंच त्याच्या शिरा दिसून येतात. या बाळाला सध्या एनआयसीयूमध्ये (Neonatal intensive care unit) ठेवण्यात आलं आहे. तिथे बाळाची प्रकृती स्थिर असल्याचं त्याची देखभाल करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमचं म्हणणं आहे. मुलाला स्पर्शही करता येत नसल्याने अडचण एलियनसारख्या दिसणाऱ्या या बाळाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पण त्याच्यावर उपचार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बाळाला कातडं नसल्याने त्याला स्पर्शही करता येत नाही. त्याच्यावर इतर ठिकाणी उपचार करण्यासाठी त्याला रेफरही करता येत नाही. कारण बाहेरील वातावरणात त्याला बाहेर काढल्यास बाळाच्या जीवाला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे त्याच्यावर रतलामच्या शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार केले जात आहेत. दरम्यान, रतलामध्ये जन्मलेल्या या बाळाची सर्वत्र चर्चा आहे. लाखांमध्ये एखाद्या बाळाला अशा प्रकारच्या अनुवंशिक आजाराला सामोरं जावं लागतं. उपचारांची दिशा ठरवताना डॉक्टरांसमोरही मोठं कोडं निर्माण झालं आहे. परंतु, तरीही त्याला वाचवण्यासाठी डॉक्टर व इतर मेडिकल स्टाफकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात