मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पहाटे घराची कडी वाजली, नवरा असल्याचं समजून दार उघडलं; अन् विवाहितेचं आयुष्य झालं उद्धवस्त

पहाटे घराची कडी वाजली, नवरा असल्याचं समजून दार उघडलं; अन् विवाहितेचं आयुष्य झालं उद्धवस्त

बीड (Beed) जिल्ह्यातील परळी (Parali) याठिकाणी एक संतापजनक घटना समोर आली आहे.

बीड (Beed) जिल्ह्यातील परळी (Parali) याठिकाणी एक संतापजनक घटना समोर आली आहे.

बीड (Beed) जिल्ह्यातील परळी (Parali) याठिकाणी एक संतापजनक घटना समोर आली आहे.

  • Published by:  News18 Desk

परळी, 02 जुलै: बीड (Beed) जिल्ह्यातील परळी (Parali) याठिकाणी एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथील एका तरुणानं विवाहित महिलेला धमकावून तिच्यावर बलात्कार (Rape on married woman ) केल्याची घटना समोर आली आहे. भल्या पहाटे चार वाजता आरोपी तरुणानं पीडित महिलेच्या घराचा दरवाजा ठोठावला. नवरा आल्याचं समजून पीडितेनं घराच दार उघडलं. यानंतर आरोपी तरुणानं जबरदस्तीनं घरात प्रवेश करत तिच्यावर बलात्कार केला आहे. याप्रकरणी पीडित महिलेनं आरोपीविरुद्ध सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस करत आहे.

संबंधित घटना परळी तालुक्यातील सिरसाळानजीकच्या खामगाव येथील आहे. घरात कुणी नसल्याचं हेरून आरोपी तरुण 28 जूनच्या पहाटे 4 वाजता पीडित विवाहितेच्या घरी पोहोचला. त्यानं घराची कडी वाजवली. नवरा आला असल्याचं समजून पीडितेनं भल्या पहाटे घराचा दरवाजा उघडला. पण दारात गावातील लहु लिंबाजी घडवे नावाचा तरुण उभा होता.

हेही वाचा-5 मित्रांकडून 14वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; 2 वर्षांपासून देत होते नरक यातना

आरोपी घडवेनं एकट्या महिलेला पाहून जबरदस्तीनं तिच्या घरात प्रवेश केला. 'गावात राहू देणार नाही' अशी धमकी देत त्यानं पीडित विवाहितेवर बलात्कार केला. तसेच घटनेची वाच्यता न करण्याची धमकीही दिली. ही घटना उघडकीस येताच परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा-कराटे शिक्षकानं अल्पवयीन मुलीला ओढलं प्रेमाच्या जाळ्यात; सज्ञान होताच नेलं पळवून

सामनानं दिलेल्या वृत्तानुसार, पीडित विवाहितेनं दुसऱ्या दिवशी सिरसाळा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी लहु लिंबाजी घडवे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधान 376 आणि 506 या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सिरसाळा पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Beed, Crime news, Rape