जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोरोनाशी झुंज अपयशी, ग्रामीण भागात विद्यार्थी घडवणारे भगत सर शिक्षकदिनी गेले

कोरोनाशी झुंज अपयशी, ग्रामीण भागात विद्यार्थी घडवणारे भगत सर शिक्षकदिनी गेले

कोरोनाशी झुंज अपयशी, ग्रामीण भागात विद्यार्थी घडवणारे भगत सर शिक्षकदिनी गेले

शिक्षकदिन दिवशी वाखरी येथील प्राथमिक आश्रमाशाळेचे मुख्याध्यापक सूर्यकांत भगत यांचा कोरोनामुळे निधन झाले.

  • -MIN READ
  • Last Updated :

पंढरपूर, 05 सप्टेंबर : आज 5 सप्टेंबर. आजचा दिवस  शिक्षक दिन (teachers day) म्हणून देशभरात साजरा केला जात आहे. पण, शिक्षकदिनाच्या पुर्वसंध्येला भटक्या विमुक्त जाती आणि जमातीमधील हजारो विद्यार्थी घडवणाऱ्या आश्रमाशाळेचे मुख्याध्यापक सूर्यकांत भगत यांचा कोरोनाचे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शिक्षकदिन दिवशी वाखरी येथील प्राथमिक  आश्रमाशाळेचे मुख्याध्यापक सूर्यकांत भगत यांचा कोरोनामुळे निधन झाले. कोरोना काळात रोज शाळेवर येऊन आपले कर्तव्य प्रामाणिकपणे काम करणारे भगत यांना गेल्या काही दिवसांपासून त्रास जाणवू लागला होता. त्यांची कोरोनाची चाचणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.  येथे त्यांचा रात्री मृत्यू झाला. फडणवीस सरकारने आरोग्यविषयक काम केले असते तर…, शिवसेनेचं टीकास्त्र आज सकाळी कोरोनाच्या नियमानुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. केवळ 52 व्या वर्षी कोरोनामुळे अकाली मृत्यू झाल्याने भगत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भटक्या विमुक्त जाती आणि जमातीमधील हजारो विद्यार्थी घडवणाऱ्या विद्यार्थी प्रिय मुख्याध्यापकांच्या अचानक मृत्यूमुळे सर्व शिक्षक व पालक वर्गात हळहळ व्यक्त केली जात आहे. आता प्रशासन आश्रमशाळेतील त्यांच्या सहकारी शिक्षकांची कोरोना चाचणी घेणार आहे. प्रेम प्रकरणातून घडली भयंकर घटना, भर रस्त्यातच पेटवून दिली रुग्णवाहिका शिक्षकदिनाच्या दिवशी भगत यांचे निधन झाल्यामुळे विद्यार्थी वर्गात शोककळा पसरली आहे.  या घटनेमुळे परिसरात भितीदायक वातावरण  आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात