मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सर्वांना सुट्टी देत पीडितेला सोडवायला लावलं गणित अन्...; शिक्षकाच्या कृत्याने वर्धा हादरलं

सर्वांना सुट्टी देत पीडितेला सोडवायला लावलं गणित अन्...; शिक्षकाच्या कृत्याने वर्धा हादरलं

Crime in Wardha: वर्ध्यातील एका नराधमाने शिक्षिकी पेशाला काळिमा फासली आहे. आरोपीनं पीडित मुलीला गणित सोडवायला सांगून तिच्यासोबत संतापजनक कृत्य केलं आहे.

  • Published by:  News18 Desk
वर्धा, 22 डिसेंबर: मागील काही काळापासून महाराष्ट्रात अल्पवयीन मुली आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. राज्यातील प्रत्येक कोपऱ्यातून दररोज अत्याचाऱ्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. अशीच एक घटना वर्ध्यात (Wardha) घडली आहे. येथील एका नराधमाने शिक्षिकी पेशाला काळिमा फासली आहे. नराधम शिक्षकाने वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना सुट्टी देत पीडित मुलीसोबत घृणास्पद कृत्य केलं आहे. आरोपीनं पीडित मुलीला गणित सोडवायला सांगून तिच्यावर अत्याचार केला (Minor student raped by teacher) आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक (Accused teacher arrested) केली आहे. दीपक मंडलिक असं अटक झालेल्या आरोपी शिक्षकाचं आहे. आरोपी दीपक हा वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील धुमनखेडा येथील जिल्हा परिषदेच्या (Dhumankheda ZP School) शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला आहे. घटनेच्या दिवशी 2 डिसेंबर रोजी आरोपी दीपक याने वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना सुट्टी दिली होती. तर पीडित मुलीला एकटीला वर्गात बसायला सांगून गणित सोडवायला लावलं होतं. हेही वाचा-चिमुकलीच्या गळ्यावर चाकू ठेवत आईवर केला बलात्कार; महाराष्ट्राला हादरवणारी घटना गणित सोडवत असताना आरोपी शिक्षकाने पीडितेजवळ जावून तिला दोन हजार रुपये दिले आणि तिच्याशी लैंगिक चाळे सुरू (give 2000 rs and raped minor student) केले. घाबरलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीने काही वेळ आरोपीचा त्रास सहन केल्यानंतर, हातातील सर्व पैसे आरोपीच्या तोंडावर फेकून वर्गातून पळ काढला. नराधम शिक्षकाच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर पीडित मुलीने घरी जाऊन सर्व प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला आहे. हेही वाचा-डान्स शिकवण्याच्या नावाखाली सुरू होता भलताच उद्योग; टीचरचं कृत्य वाचून हादराल या धक्कादायक प्रकार उघडकीस येताच, कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी शिक्षकाविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी शिक्षक दीपक मंडलिक याला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
First published:

Tags: Crime news, Rape, Wardha

पुढील बातम्या