मराठी बातम्या /बातम्या /देश /नृत्य शिकवण्याच्या नावाखाली सुरू होता भलताच उद्योग; डान्स टीचरजवळ सापडले मुलींचे अश्लील VIDEO

नृत्य शिकवण्याच्या नावाखाली सुरू होता भलताच उद्योग; डान्स टीचरजवळ सापडले मुलींचे अश्लील VIDEO

Crime News: एका डान्स टीचरने नृत्य शिकण्यासाठी येणाऱ्या मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचं लैंगिक शोषण केल्याचा (dance teacher raped student) धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Crime News: एका डान्स टीचरने नृत्य शिकण्यासाठी येणाऱ्या मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचं लैंगिक शोषण केल्याचा (dance teacher raped student) धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Crime News: एका डान्स टीचरने नृत्य शिकण्यासाठी येणाऱ्या मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचं लैंगिक शोषण केल्याचा (dance teacher raped student) धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

कानपूर, 21 डिसेंबर: एका डान्स टीचरने नृत्य शिकण्यासाठी येणाऱ्या मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचं लैंगिक शोषण (dance teacher raped student) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी डान्स टीचर पीडित मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. त्यानंतर संबंधित मुलींचे अश्लील व्हिडीओ शूट करून त्यांना ब्लॅकमेल (Shoot obscene video and blackmail) करायचा. आरोपी डान्स टीचरने आतापर्यंत अशाच प्रकारे तब्बल 14 मुलींची फसवणूक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली (accused dance teacher arrested)असून पुढील तपास सुरू आहे.

आर्यन सोनी उर्फ ​​हिमांशू सोनी असं अटक केलेल्या आरोपी डान्स टीचरचं नाव आहे. आरोपी सोनी हा उत्तर प्रदेशातील कानपूर येथील रहिवासी असून तो दाबौली परिसरात 'अर्बन डान्स अॅकॅडेमी' नावाने डान्स क्लासेस चालवतो. गेल्या चार वर्षांपासून तो डान्स क्लासेस चालवत आहे. नराधम आरोपी सोनी हा याठिकाणी डान्स शिकण्यासाठी येणाऱ्या मुलींना डान्स शिकवण्याच्या नावाखाली लैंगिक चाळे करायचा. तसेच निष्पाप मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याचं लैंगिक शोषणही करायचा.

हेही वाचा-चिमुकलीच्या गळ्यावर चाकू ठेवत आईवर केला बलात्कार; महाराष्ट्राला हादरवणारी घटना

एवढंच नव्हे तर आरोपी पीडित मुलींचे अश्लील व्हिडीओ शूट करून त्यांना ब्लॅकमेल करायचा. गेल्या काही काळात आरोपीनं अशा पद्धतीने अनेक मुलींची फसवणूक करत त्यांच्याकडे पैसे उकळले आहेत. अलीकडेच आरोपी डान्स टीचर अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत एका मुलीला ब्लॅकमेल करत होता. पण आरोपीला देण्यासाठी तिच्याकडे पैसे नसल्याने तिने आपल्या आईच्या अकाउंटमधून आरोपीला काही पैसे ट्रान्सफर केले.

हेही वाचा-मित्रानेच केला घात, पिंपरीत 19 वर्षीय तरुणीवर तिघांकडून सामूहिक बलात्कार

बँक खात्यातून अचानक पैसे गायब झाल्याने पीडित मुलीच्या आईने गोविंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गुन्हे शाखेच्या सायबर सेलने या घटनेचा तपास केला असता, ब्लॅकमेलिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीच्या जबाबानुसार पोलिसांनी डान्स टिचरला अटक केली असता, त्याच्या मोबाइलमध्ये अन्य 14 मुलींचे अश्लील व्हिडीओ सापडले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी डान्स टिचर आर्यन सोनीला अटक केली असून पुढील तपास केला जात आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime news, Rape, Uttar pradesh