मुंबई, 27 ऑक्टोबर : वेदांता फॉक्सकॉनवरून राजकारण रंगलेलं असतानाच आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून गेल्याचं समोर येत आहे. टाटा आणि एअरबस या कंपनीचा प्रोजेक्ट गुजरातच्या बडोद्यामध्ये गेला आहे. भारतीय हवाईदलासाठी C295 वाहतूक विमान बनवण्याची जबाबदारी टाटा एअरबसवर सोपवण्यात आली आहे. टाटा एअरबस कंपनी या विमानांची निर्मिती बडोदा इथल्या प्लांटमध्ये करणार आहे. 30 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी C295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी करणार आहेत. हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाविकासआघाडीकडून टीका करण्यात येत आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणं म्हणजे गुजरातने पुन्हा सर्जिकल स्ट्राईक केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. टाटा एअरबसचा प्रकल्प वर्षभरापूर्वीच गुजरातला गेलाय. महाविकासआघाडीकडून पाप लपवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. काय आहे C-295 प्रकल्प? 56 विमानांच्या निर्मितीसाठी करार 21 हजार कोटींचा सामंजस्य करार AVRO-748 ची जागा C-295 विमानं घेणार भारत सरकार आणि एअरबसमध्ये करार पहिली 16 विमानं पुढच्या 4 वर्षांमध्ये मिळणार 40 विमानांची निर्मिती करणार टाटा ऍडव्हान्स सिस्टीम निर्मिती करणार एअरबस युरोपमधील विमान निर्मिती कंपनी राष्ट्रवादीने मागितला मुख्यमंत्र्यांचा राजीनामा ‘वेदांत फॉक्सकॉनमधून बाहेर पडल्यानंतर सी-२९५ मिलिटरी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट तयार करण्याचा टाटा एअरबसचा प्रकल्प नागपुरात येईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले होते. मात्र एकनाथ शिंदे यांची खोटी भूमिका आता सर्वांसमोर उघडी पडलेली आहे. महाराष्ट्रातून मेगा प्रकल्प गुजरातला हस्तांतरीत करण्यासाठीच भाजपने शिंदेना मुख्यमंत्री पदावर बसवले आहे. एकनाथ शिंदे यांनीही लिज ट्रस यांच्याप्रमाणे राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. ‘लिज ट्रसप्रमाणे तुम्हीही राजीनामा द्या’, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.