मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'अडीच वर्ष उद्धव ठाकरे फक्त नावालाच होते, खरे मुख्यमंत्री तर...'; तानाजी सावंतांनी पुन्हा साधला निशाणा

'अडीच वर्ष उद्धव ठाकरे फक्त नावालाच होते, खरे मुख्यमंत्री तर...'; तानाजी सावंतांनी पुन्हा साधला निशाणा

उद्धव ठाकरे-तानाजी सावंत

उद्धव ठाकरे-तानाजी सावंत

राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत उद्धव ठाकरे हे फक्त नावाला मुख्यमंत्री होते, खरे मुख्यमंत्री हे राष्ट्रवादीचे होते, असा टोला त्यांनी लगावला आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

उस्मानाबाद 25 सप्टेंबर : शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिंदे आणि ठाकरे गटातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत उद्धव ठाकरे हे फक्त नावाला मुख्यमंत्री होते, खरे मुख्यमंत्री हे राष्ट्रवादीचे होते, असा टोला त्यांनी लगावला आहे.

'नवरीनं माहेर सोडावं, तसं उद्धव ठाकरेंनी ‘वर्षा’ बंगला सोडला', भुमरेंची बोचरी टीका

या राष्ट्रवादीवाल्यांनी गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्र लुटून खाल्ला असल्याचं म्हणत सावंत यांनी राष्ट्रवादीवरही टीका केली आहे. उस्मानाबादमध्ये दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी आयोजित केलेल्या हिंदूगर्जना मेळाव्यात बोलत असताना त्यांनी ही टीका केली आहे.

बीडमध्येही उद्धव ठाकरेंवर टीका करताना तानाजी सावंत म्हणाले होते की, 'ज्या बापाने तुम्हाला जन्माला घातले त्या बापाची विचारधारा तुम्ही सोडून दिलीत. ते आम्हाला म्हणतात तुम्ही माझ्या बापाचे फोटो लावू नका. पण तुम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो का लावता. शिवाजी महाराज आणि तुमचा संबंध काय असा प्रश्नही तानाजी सावंत यांनी विचारला.'

देवेंद्र फडणवीस तब्बल सहा जिल्ह्यांचे प्रमुख, पालकमंत्र्यांच्या यादीत भाजपचाच वरचष्मा

आरोग्य विभागाची नवीन योजना -

आहे त्या जागेवर शेतात, घरी, रस्त्यावर सरकार आता आरोग्याच्या सुविधा देणार आहे. यासाठी मंत्रालयामध्ये 104 नंबरचं कॉल सेंटर उभारणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी केली आहे. चांद्यापासून बांधापर्यंत ही योजना राबवणार असून अगदी सर्वसामान्य माणसालाही या योजनेतून उपचार देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे डॉ तानाजी सावंत यांनी सांगितले आहे .ते उस्मानाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली

First published:

Tags: Political leaders, Uddhav Thackeray