मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अकोल्यात महिला तलाठ्याचा प्रताप, मोबाइलवर मारला डल्ला; CCTV मध्ये पकडली गेली चोरी

अकोल्यात महिला तलाठ्याचा प्रताप, मोबाइलवर मारला डल्ला; CCTV मध्ये पकडली गेली चोरी

महिला तलाठी मोबाइल चोरताना सीसीटीव्हीत कैद... (फोटो- साम टीव्ही)

महिला तलाठी मोबाइल चोरताना सीसीटीव्हीत कैद... (फोटो- साम टीव्ही)

Crime in Akola: पेट्रोल पंपावर (Petrol Pump) दुचाकीत पेट्रोल भरत असताना एका महिला तलाठ्यानं पंपावरील मोबाइल फोन (Woman Talathi Theft Mobile) चोरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

  • Published by:  News18 Desk

अकोला, 04 सप्टेंबर: पेट्रोल पंपावर (Petrol Pump) दुचाकीत पेट्रोल भरत असताना एका महिला तलाठ्यानं पंपावरील मोबाइल फोन (Woman Talathi Theft Mobile) चोरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी महिला तलाठ्यानं आपल्या दुचाकीत पेट्रोल भरल्यानंतर, पंपावरील कर्माचाऱ्यांची नजर चुकवून पटकण मोबाइल लंपास केला आहे. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली (woman talathi captured in CCTV while theft mobile) आहे. संबंधित सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक (Accused Arrest) केली आहे. मोबाइल चोर महिला तलाठी असल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसही हैराण झाले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

गायत्री सुनिल कोरडे असं मोबाइल चोर महिला तलाठ्याचं नाव असून त्या अकोला जिल्ह्यातील मलकापूर येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी महिलेला अटक केली आहे. तसेच तिच्याकडून चोरी केलेला मोबाइल फोनही जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपी महिलेला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. संबंधित महिला अकोला तालुक्यातील म्हैसांग याठिकाणी तलाठी पदावर कार्यरत आहे

हेही वाचा-...अन् कंपनीच्या खजिन्यावरच मारला डल्ला; तरुणानं BMW कार घेत उधळले करोडो रुपये

नेमकं काय घडलं?

साम टीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित घटना 6 एप्रिल 2021 रोजी अकोल्यातील अग्रसेन चौकातील पेट्रोल पंपावर घडली आहे. दरम्यान आरोपी महिला तलाठी याठिकाणी आपल्या दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी आली होती. यावेळी त्यांनी दुचाकीत पेट्रोल भरून झाल्यानंतर कर्मचाऱ्यांची नजर चुकवून पंपावरील मोबाइल फोन चोरला आहे. संबंधित फोन कर्मचाऱ्यानं पेट्रोलपंप व्यवहारासाठी ठेवला होता. याच मोबाइलमध्ये फोन पे द्वारे रक्कम जमा करण्यात येत होती.

हेही वाचा-अपहरण करून बाळाला परराज्यात विकलं; 48तासांत मुंबई पोलिसांनी घडवली मायलेकराची भेट

पण महिला तलाठ्यानं त्याच फोनवर डल्ला मारला आहे. त्यानंतर संबंधित मोबाइल फोन गायब असल्याचं कर्मचाऱ्याच्या लक्षात आलं. सर्वत्र शोधाशोध करूनही कुठेही फोन आढळला नाही. शेवटी सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता, एका महिला मोबाइल चोरताना आढळली. याप्रकरणी पेट्रोल पंप कर्मचाऱ्यानं अज्ञात महिलेविरोधात रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. संबंधित सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेतला असता, संबंधित मोबाइल चोर महिला म्हैसांग येथील तलाठी असल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

First published:

Tags: Akola, Crime news, Theft