Home /News /maharashtra /

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना Mucormycosisचा धोका शून्य?

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना Mucormycosisचा धोका शून्य?

कोरोना (Corona Vaccine) लसीचे दोन डोस घेतल्यास म्यूकरमायकोसिस (Mucormycosis)चा धोका शून्यापर्यंत कमी होऊ शकतो, असा निष्कर्ष लावण्यात आला आहे. वाचा सविस्तर

    धुळे, 17 जून: कोरोना (Corona Vaccine) लसीचे दोन डोस घेतल्यास म्यूकरमायकोसिस (Mucormycosis)चा धोका शून्यापर्यंत कमी होऊ शकतो, असा निष्कर्ष लावण्यात आला आहे. (Dhule) धुळ्यातील 300 रुग्णांच्या तपासणीतून हा निष्कर्ष काढण्यात आल्याचं वृत्त आहे. दिव्य मराठीनं दिलेल्या वृत्तानुसार, ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. अशा रुग्णांना म्यूकरमायकोसिसचा धोका शून्यापर्यंत कमी होऊ शकतो. धुळ्यातील हिरे रुग्णानं 300 रुग्णांची तपासणी केली. या रुग्णांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. अशा रुग्णांना म्यूकरमायकोसिसचा धोका शून्यापर्यंत कमी होण्याची शक्यता आहे, असा निष्कर्ष रुग्णालयानं तपासणीतून लावला आहे. गेल्या अडीच महिन्यांत 300 रुग्णांची हिरे रुग्णालयात बाह्यरुग्ण कक्षात तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. यापैकी कोरोनाच्या दोन्ही लसीचा डोस घेतलेल्या एकालाही म्यूकरमायकोसिसची लागण झालेली नाही. म्यूकरबाधित एकही रुग्ण आढळलेला नाही. हेही वाचा- 'मेहुल चोक्सीला आधीपासूनच कारवाईची कल्पना होती', CBI चा दावा या सर्व 300 रुग्णांची उपचार-केस स्टडीसाठी इत्थंभूत माहिती घेण्यात आली. यात कोरोना झाला होता का, कुठे आणि कसे उपचार घेण्यात आले. यापासून लस घेतली का अशी माहिती संकलित करण्यात आली. त्यानंतर गोळा करण्यात आलेल्या डेटाचं विश्लेषण करण्यात आलं. विश्लेषण केल्यानंतर दोन्ही डोस घेणाऱ्यांना म्यूकरचा धोका शून्यवत होतो हा निष्कर्ष समोर आला आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणी मोठी घडामोड, प्रदिप शर्मा NIAच्या ताब्यात या निष्कर्षाला बळकटी देणारे पुरावे-बाबी आणि संपूर्ण विश्लेषणात्मक माहिती मुंबईला वरिष्ठांकडे पाठवण्यात आली आहे. तसंच करण्यात आलेले हे विश्लेषण देशपातळीवरही महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे, असा विश्वास हिरे रुग्णालयाच्या प्रशासनानं व्यक्त केला आहे. आतापर्यंत 70 म्यूकरचे रुग्ण आढळून असून यापैकी सुमारे 17 रुग्णांवर आवश्यकतेनुसार लहान- मोठी शस्त्रक्रिया केली. दिव्य मराठीनं दिलेल्या वृत्तानुसार, या रुग्णालयात कोरोनासह म्यूकरमायकोसिसच्या बाधितांवरही उपचार केलेत. जवळपास सुमारे 300 रुग्णांची हिरे रुग्णालयात तपासणी झाली. या रुग्णांची माहिती केस स्टडीसाठी घेतल्यावर कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या एकाही रुग्णाला म्यूकरमायकोसिसची लागण झाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. ही माहिती विश्लेषणातून संकलित करण्यात आल्याचं हिरे रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितलं.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus

    पुढील बातम्या