इम्तियाज अली, प्रतिनिधी
भुसावळ, 31 जुलै : जळगाव (jalgaon) जिल्ह्यातील भुसावळ (Bhusawal ) शहरात तीन बंदुकींसह (gun) चार तलवारीचा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईआधी दोन संशयित पसार झाले आहे. पसार झालेल्या आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील खडका रोड भागातील दोन संशयीतांकडे घातक शस्त्र असल्याची माहिती भुसावळचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी बाजारपेठ पोलिसांना कारवाईचे आदेश दिले होते.
पोलिसांच्या पथकांनी धडक कारवाई करीत दोन संशयीतांच्या घरातून चार तलवारी, चार चाकूंसह तीन शिकारीच्या बंदूक जप्त केल्या आहे. या प्रकरणी शेख पप्पू अब्बास शेख उर्फ शिकारी व त्याचा मुलगा रीजवान पप्पू शेख (दोन्ही रा.खडका रोड, नवीन ईदगाहसमोर, मुस्लीम कॉलनी, भुसावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीत पसार झाले आहेत.
Tokyo Olympics : भारताचे मेडल हुकले, बॉक्सिंगमध्ये पूजा राणी पराभूत
बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने सायंकाळी संशयीत आरोपी शेख पप्पू अब्बास शेख यांच्या खडका रोडवरील घरातून चार लोखंडी तलवारी तसंच चार चाकू व एक रायफल, एक बंदूक व एक शिकारीची बंदूक मिळून एकूण चार हजार रुपये किंमतीचा शस्त्र साठा जप्त केला आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी प्रशांत नीळकंठ सोनार यांच्या फिर्यादीनुसार, दोघा पिता-पूत्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. फरार पिता पुत्रांचा शोध सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.