जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Tokyo Olympics : भारताचे मेडल हुकले, बॉक्सिंगमध्ये पूजा राणी पराभूत

Tokyo Olympics : भारताचे मेडल हुकले, बॉक्सिंगमध्ये पूजा राणी पराभूत

Tokyo Olympics : भारताचे मेडल हुकले, बॉक्सिंगमध्ये पूजा राणी पराभूत

महिला बॉक्सिंगमध्ये 75 किलो वजनी गटात भारताची पूजा राणीचं (Pooja Rani) आव्हान संपुष्टात आलं आहे. पूजाचा टोकयो ऑलिम्पिकमधील क्वार्टर फायनलमध्ये पराभव झाला.

  • -MIN READ
  • Last Updated :

टोकयो, 31 जुलै : महिला बॉक्सिंगमध्ये  75 किलो वजनी गटात भारताची पूजा राणीचं (Pooja Rani) आव्हान संपुष्टात आलं आहे. पूजाचा टोकयो ऑलिम्पिकमधील क्वार्टर फायनलमध्ये पराभव झाला. पूजा ऑलिम्पिक मेडलपासून फक्त एक विजय दूर होती. या पराभवामुळे तिचे ऑलिम्पिक मेडल हुकले आहे. पूजाची लढत चीनच्या ली क्यूशी होती. ली क्यूनं रियोमध्ये 2016 साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावले होते. ली क्यूनं पहिल्या राऊंडमध्ये आक्रमक सुरुवात केली. त्यामुळे पूजाला बचावात्मक खेळावं लागलं. ली क्यूनं पूजाचा पहिल्या राऊंडमध्ये पराभव केला. पूजानं दुसऱ्या राऊंडमध्ये जोरदार प्रयत्न केला, पण लीन क्यूच्या अनुभवापुढे तिचा निभाव लागला नाही. लीन क्यूनं तिसऱ्या राऊंडमध्येही सरस खेळ करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला.

जाहिरात

पूजाचा प्रवास दोन वेळा आशियाई चॅम्पियन असलेल्या पूजानं यापूर्वी अल्जेरियाचा इचरॅक चॅबचा 5-0 असा सरळ पराभव केला होता. पूजानं या मॅचमध्ये जोरदार खेळ करत इचरॅकला कोणतीही संधी दिली नाही, तिनं सुरुवातीपासूनच आघाडी घेत विजय मिळवला होता.वैयक्तिक आयुष्यातल्या अडचणी, शारीरिक समस्यांमधून वाट काढत पूजा राणीने हे यश संपादन केलं आहे. एक वेळ अशी होती, की तिचा हात भाजला होता, बॉक्सिंग खेळण्यासाठी कुटुंबातून विरोध होता. तसंच आर्थिक चणचणदेखील होती; मात्र या सर्व अडचणींवर पूजा राणीने मात केली असून, ती अनेक खेळाडूंसाठी प्रेरणा ठरली आहे. लवलीनंच मेडल नक्की! भारताची  बॉक्सर  लवलीना बोरगहेन (Lovlina Borgohain) 69 किलो वजनी गटाच्या बॉक्सिंग स्पर्धेच्या सेमी फायमलमध्ये प्रवेश केला आहे.  लवलीनानं निएन चिन चेनचा पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. बॉक्सिंगमध्ये ब्रॉन्झ मेडलसाठी मॅच होत नाही. त्यामुळे सेमी फायनलमधील मॅचचा निकाल काहीही लागला तरी लवलीनाचं मेडल नक्की झाले आहे. यापूर्वी लंडन ऑलिम्पिकमध्ये मेरी कोमनं ब्रॉन्झ मेडल पटकावले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात