मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /बीडमध्ये चाललं काय? पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच दोघांवर तलवारीने सपासप वार, LIVE VIDEO

बीडमध्ये चाललं काय? पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच दोघांवर तलवारीने सपासप वार, LIVE VIDEO

दोघांच्या अंगावर तलवारीचे गंभीर वार असून अखिलच्या डोक्यात 15 टक्के पडले आहे.

दोघांच्या अंगावर तलवारीचे गंभीर वार असून अखिलच्या डोक्यात 15 टक्के पडले आहे.

दोघांच्या अंगावर तलवारीचे गंभीर वार असून अखिलच्या डोक्यात 15 टक्के पडले आहे.

बीड, 10 ऑक्टोबर : बीडमध्ये (Beed) गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून कायद्याचा धाक आहे की नाही प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच (Superintendent of Police office Beed ) भर रस्त्यावर तलवारीने (Sword attack) वार केल्याची घटना घडली आहे.  पाच ते सात जनांकडून दोघांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.  गंभीर जखमी तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

बीड शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर भर रस्त्यात पाच ते सात गुंडांकडून 2 तरूणांना तलवारीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे बीड जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था आहे का? पोलिसांचा धाक उरला आहे का?असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

5 ते 7 गुंडांनी दोन तरुणांना बेदम मारहाण केली. त्यानंतर तलवारीने त्यांच्यावर वार करण्यात आले.  अद्याप या प्रकरणात गुन्हा देखील दाखल झाला नाही. तसंच जखमी असलेल्यांचा साधा जवाब देखील घेतला गेला नाही.

IPL : हे खेळाडू सपशेल फेल, एका विकेटची किंमत 1 कोटी, 5 कोटी मिळूनही अर्धशतक नाही

मारहाण झाले दोन्ही तरुण बीड शहरातील असून अखिल खान (वय25) आणि काफील खान(वय 32) आहे. दोघांच्या अंगावर तलवारीचे गंभीर वार असून अखिलच्या डोक्यात 15 टक्के पडले आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर भररस्त्यात अशा पद्धतीने गुंडांकडून मारहाण होत असताना कोणी सोडवायचा देखील प्रयत्न केला नाही किंवा आवाज ऐकू आल्यानंतर पोलीस देखील त्या ठिकाणी धावत आले नाही.

त्यामुळे संताप व्यक्त केला जात असून जर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर अशा प्रकारची घटना घडत असेल तर इतर ठिकाणी लोक सुरक्षित कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

First published:

Tags: Sword-attack