मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : हे खेळाडू ठरले सपशेल फेल, एका विकेटची किंमत 1 कोटी, 5 कोटी मिळूनही अर्धशतक नाही

IPL 2021 : हे खेळाडू ठरले सपशेल फेल, एका विकेटची किंमत 1 कोटी, 5 कोटी मिळूनही अर्धशतक नाही

आयपीएलची लीग स्टेज संपल्यानंतर आता आजपासून प्ले-ऑफला (IPL 2021) सुरुवात होत आहे. दिल्ली, चेन्नई, बँगलोर आणि कोलकात्याच्या टीम प्ले-ऑफमध्ये पोहोचल्या.

आयपीएलची लीग स्टेज संपल्यानंतर आता आजपासून प्ले-ऑफला (IPL 2021) सुरुवात होत आहे. दिल्ली, चेन्नई, बँगलोर आणि कोलकात्याच्या टीम प्ले-ऑफमध्ये पोहोचल्या.

आयपीएलची लीग स्टेज संपल्यानंतर आता आजपासून प्ले-ऑफला (IPL 2021) सुरुवात होत आहे. दिल्ली, चेन्नई, बँगलोर आणि कोलकात्याच्या टीम प्ले-ऑफमध्ये पोहोचल्या.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 10 ऑक्टोबर : आयपीएलची लीग स्टेज संपल्यानंतर आता आजपासून प्ले-ऑफला (IPL 2021) सुरुवात होत आहे. दिल्ली, चेन्नई, बँगलोर आणि कोलकात्याच्या टीम प्ले-ऑफमध्ये पोहोचल्या. या मोसमाआधी झालेल्या लिलावात बऱ्याच टीमनी खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लावली, पण अनेकांना त्यांना मिळालेल्या पैशांसारखी कामगिरी मात्र करता आली नाही. आयपीएलच्या या लिलावात दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर क्रिस मॉरिस (Chris Morris) 16.25 कोटी रुपयांना विकला गेला, पण राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) मॉरिसची एक विकेट जवळपास एक कोटी रुपयांना पडली.

क्रिस मॉरिस या मोसमातल्या 14 पैकी फक्त 11 मॅच खेळला, दुखापतीमुळे त्याला संपूर्ण स्पर्धा खेळता आली नाही. यावेळी त्याने 25 च्या सरासरीने 15 विकेट घेतल्या. त्याची एकूण रक्कम आणि विकेट बघता त्याला एका विकेटसाठी जवळपास 1.08 कोटी रुपये मिळाले. मॉरिसने 9.17 च्या इकोनॉमी रेटने रन दिले. 23 रन देऊन 4 विकेट त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. बॅटिंगमध्येही त्याला चमकदार कामगिरी करता आली नाही. 13 च्या सरासरीने त्याने 67 रन केले. नाबाद 36 रन त्याचा सर्वाधिक स्कोअर होता.

पंजाबचा शाहरुख 5.25 कोटी रुपयांचा

आयपीएल लिलावात (IPL Auction) पंजाब किंग्सने (Punjab Kings) शाहरुख खानला (Shahrukh Khan) 5.25 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. शाहरुखची बेस प्राईज तेव्हा 20 लाख रुपये होती. पंजाब आणि बँगलोर लिलावात शाहरुखवर तुटून पडले होते. आयपीएलआधी टी-20 क्रिकेटमध्ये शाहरुखला एकही अर्धशतक करता आलं नव्हतं, पण मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत त्याने मोठमोठे शॉट मारले होते. आयपीएलमध्ये मात्र तो अपयशी ठरला. 11 मॅचमध्ये त्याने फक्त 153 रन केले. 47 रन त्याचा सर्वोत्तम स्कोअर होता. म्हणजेच आयपीएलमध्येही त्याला अर्धशतक करता आलं नाही.

झाय रिचर्डसन 14 कोटी रुपयांचा

पंजाब किंग्सने ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर झाय रिचर्डसनला (Jhye Richardson) 14 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. त्याने 3 मॅचमध्ये 3 विकेट घेतल्या, पण कोरोनामुळे तो दुसऱ्या राऊंडमध्ये खेळण्यासाठी आला नाही. नियमांनुसार त्याला अर्ध मानधन मिळेल, त्यामुळे त्याला 7 कोटी रुपये जरी मिळाले तरी त्याच्या एका विकेटची किंमत 2.33 कोटी रुपये एवढी आहे. ऑस्ट्रेलियाचा रिले मेरेडिथही (Riley Meredith) दुसऱ्या राऊंडमध्ये खेळण्यासाठी आला नाही. पंजाबनेच मेरेडिथला 8 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. मेरेडिथने 5 मॅचमध्ये 4 विकेट घेतल्या. मेरेडिथची एक विकेटही पंजाबला 1 कोटी रुपयांना मिळाली. ऑस्ट्रेलियाच्या मोईसेस हेनरिक्सवर (Moises Henriques) पंजाबने 4.20 कोटी रुपये खर्च केले. त्याने 5 मॅचमध्ये 4 विकेट घेतल्या. आयपीएलच्या दुसऱ्या राऊंडमध्येही तो खेळला. हेनरिक्सची एक विकेटही पंजाबला 1 कोटी रुपयांना मिळाली.

शिवम दुबेही अपयशी

ऑलराऊंडर शिवम दुबे (Shivam Dube) याच्यावर राजस्थान रॉयल्सने 4.40 कोटी रुपयांची बोली लावली. या मोसमात त्याने फक्त 9 मॅच खेळल्या. एका अर्धशतकाच्या मदतीने त्याने 120 रन केले, तसंच त्याला एकही विकेट घेता आली नाही. हैदराबादने केदार जाधवला 2 कोटी रुपयांना विकत घेतलं. 6 मॅचमध्ये त्याला 55 रन करता आले.

First published:

Tags: IPL 2021