मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Sushama Andhare : शिंदे गटातील 40 आमदार भाजपमध्ये घेण्यासाठी फडणवीसांचा ट्रॅप, ठाकरे गटाचा दावा

Sushama Andhare : शिंदे गटातील 40 आमदार भाजपमध्ये घेण्यासाठी फडणवीसांचा ट्रॅप, ठाकरे गटाचा दावा

एकनाथ शिंदे गटातील 40 आमदार भाजपमध्ये घेण्याचा देवेंद्रजींचा ट्रॅप सध्या सुरू आहे. शिंदे गट भाजप संपवत आहे हे एकनाथ भाऊंना कळत नाही.

एकनाथ शिंदे गटातील 40 आमदार भाजपमध्ये घेण्याचा देवेंद्रजींचा ट्रॅप सध्या सुरू आहे. शिंदे गट भाजप संपवत आहे हे एकनाथ भाऊंना कळत नाही.

एकनाथ शिंदे गटातील 40 आमदार भाजपमध्ये घेण्याचा देवेंद्रजींचा ट्रॅप सध्या सुरू आहे. शिंदे गट भाजप संपवत आहे हे एकनाथ भाऊंना कळत नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pandharpur, India

विरेंद उत्पत (पंढरपूर), 25 डिसेंबर : एकनाथ शिंदे गटातील 40 आमदार भाजपमध्ये घेण्याचा देवेंद्रजींचा ट्रॅप सध्या सुरू आहे. शिंदे गट भाजप संपवत आहे हे एकनाथ भाऊंना कळत नाही. तसेच माझ्यावर टीका करणारे वारकरी सांप्रदायाचे नव्हे तर मोहन भागवत सांप्रदायाचे कीर्तनकार प्रहसनकार असल्याची घाणाघाती टीका ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे म्हणाले. त्या आज पंढरपूर दौऱ्यावर होत्या यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटातील आमदारांचा चांगलाच समाचार घेतला.

अंधारे पुढे म्हणाल्या की, सांगोल्याचे आमदार शहाजी बापू हा माझा रांगडा भाऊ थोडा चुकला आहे. पण मी बोलून समजावेन. एकनाथभाऊ शिंदे यांना समजत नाही., की भाजपाच शिंदे गटाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपाचा पर्यायाने देवेंद्रजींचा ट्रॅप आहे की 40 आमदार भाजपमध्ये घ्यायचे. भाजपाचा पक्ष वाढवायचा आणि थेट मोदींच्या पंतप्रधान पदावर दावा ठोकून कधी देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होतील हे कळणार नाही. अशी खोचक टिपणी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी पंढरपुरात केली.

हे ही वाचा : दिशा सालियान प्रकरण अचानक चर्चेत कसं आलं?, राऊतांनी नेमकं कारण सांगितलं

तसेच माझ्यावर टीका करणारे कीर्तनकार वारकरी सांप्रदायिक हे खरे वारकरी आहेत तर ते मोहन भागवत सांप्रदायाचे वारकरी, कीर्तनकार, प्रहसनकार आहेत पेड कीर्तनकार आहेत. अशी टीका देखील वारकरी संप्रदायाच्या आंदोलनावर अंधारे यांनी केली. तसेच माझ्या वक्तव्यासारखे सावरकरांनी श्री रविशंकर यांनी देखील लिहिले आहे त्यांना किंवा त्यांच्या विचाराची भूमिका घेणाऱ्या लोकांना संप्रदायिका प्रश्न का विचारत नाही. असा सवाल देखील यावेळी केला.

तसेच सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील हे माझे भाऊ आहेत ते थोडेसे चुकलेत रांगडा भाऊ आहे. त्यांच्याशी बोलून त्यांना समजावून सांगण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचे देखील यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या.

दरम्यान त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील आरोप केला आहे. राज्यपाल हटाव व इतर गोष्टींना झाकण्याचे टीम देवेंद्रजींचे प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून माझ्या क्लिपचा वापर केला जात आहे. देवेंद्रजींच्या भाषेत मी जर चार महिन्यांचे बाळ असेल आणि चार महिन्यातच त्यांना सळो की पळो करत असेल तर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटातील शिवसैनिकांच्या मनात किती राग असेल असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

हे ही वाचा : हे तर मोहन भागवत यांच्या....; सुषमा अंधारेंचा वारकऱ्यांवर गंभीर आरोप, वाद आणखी चिघळणार?

माझ्या क्लिपबाबत चर्चा होते, मात्र सावरकरांनीही तेच लिहून ठेवलं आहे, श्री श्री रविशंकर यांनी देखील हेच लिहलं आहे, मग त्यावर चर्चा का होत नाही. मी शिवसेनेत असल्यामुळे हे सर्व सुरू असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.

First published:

Tags: Cm eknath shinde, Devendra Fadnavis, Pandharpur (City/Town/Village), Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)