जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ...म्हणून त्यांनी मला मारलं, आमदार राऊतांकडून कानशिलात खाणारा कार्यकर्ताच आला समोर, VIDEO

...म्हणून त्यांनी मला मारलं, आमदार राऊतांकडून कानशिलात खाणारा कार्यकर्ताच आला समोर, VIDEO

'त्यांना मला मारण्याचा पुर्णपणे अधिकार आहे. त्याबद्दल माझी कोणतीही हरकत नाही'

'त्यांना मला मारण्याचा पुर्णपणे अधिकार आहे. त्याबद्दल माझी कोणतीही हरकत नाही'

‘त्यांना मला मारण्याचा पुर्णपणे अधिकार आहे. त्याबद्दल माझी कोणतीही हरकत नाही’

  • -MIN READ
  • Last Updated :

सोलापूर, 29 मे : बार्शीचे (barshi) आमदार राजेंद्र राऊत ( mla rajendra raut) यांनी एका कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावल्याने एकच खळबळ उडाली आहे. पण आता ज्या कार्यकर्त्यांच्या (party worker) कानाशिलात लगावली होती, तो तरुण आता समोर आला आहे. मी दारू पिऊन व्यासपीठावर गेलो होते म्हणून त्यांनी मला मारलं, असा खुलासाच या तरुणाने केला. सोलापूर  बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली होती. हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर हाच कार्यकर्ता आता समोर आला आहे.  मुन्ना विभुते असं या कार्यकर्त्याचे नाव आहे. तो आमदार राऊत यांचाच कार्यकर्ता आहे.

‘मी दारू प्यायलो होतो. माझ्याकडून गैरकृत्य होऊ नये म्हणून त्यांनी मला मारले, असा दावाच विभुते याने केला आहे.  त्यांना मला मारण्याचा पुर्णपणे अधिकार आहे. त्याबद्दल माझी कोणतीही हरकत नाही, असं स्पष्टीकरण या कार्यकर्त्याने दिलं. तर, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनीही या प्रकरणाबाबत खुलासा केला आहे.  ‘मला बदनाम करण्यासाठी विरोधकांनी कथीत व्हिडीओबद्दल खोटी माहिती दिली आहे. पाया पडलेला व्यक्ती हा माझ्या भावाच्या खडी क्रशरवरील कर्मचारी असून तो दारुच्या नशेत होता. त्याच्याकडून कोणतेही गैरकृत्य होऊ नये म्हणून त्याच्या कानशिलात लगावली, असा खुलासा राऊत यांनी केला. नेमका काय घडलं? बार्शी मतदारसंघाचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आमदारांनी एका कार्यकर्त्याच्या कानाखाली प्रसाद दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

बार्शीत एका क्रिकेटच्या सामन्याच्या कार्यक्रमावेळी आमदार राजेंद्र राऊत यांच्या पाया पडण्यासाठी एक कार्यकर्ता आला होता तो आमदारांच्या चरणावर मस्तक ठेवून लिनही झाला. मात्र तो जसा पाया पडून वर उठला तशी आमदारांनी त्याच्या कानशिलात लगावली.  मात्र, आमदार राऊत याच्या पाया पडून कानाखाली प्रसाद मिळालेल्या घटनेचा व्हिडीओ  चांगलाच व्हायरल झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात