मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /सुशांत सिंह मृत्यू प्रकरणानंतर पालघर लिंचिंगप्रकरणी सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारला फटकारलं

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणानंतर पालघर लिंचिंगप्रकरणी सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारला फटकारलं

 चूक करणाऱ्या पोलिसांवर तुम्ही कोणती कारवाई केली?, सुप्रीम कोर्टाचा सवाल

चूक करणाऱ्या पोलिसांवर तुम्ही कोणती कारवाई केली?, सुप्रीम कोर्टाचा सवाल

चूक करणाऱ्या पोलिसांवर तुम्ही कोणती कारवाई केली?, सुप्रीम कोर्टाचा सवाल

नवी दिल्ली, 6 ऑगस्ट: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत कथित आत्महत्या प्रकरणानंतर आता सुप्रीम कोर्टानं दुसर्‍याच दिवशी पालघर लिंचिंग प्रकरणी महाराष्ट्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं आहे. 'चूक करणाऱ्या पोलिसांवर तुम्ही कोणती कारवाई केली?, असा सवाल करत सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारची कानउघाडणी केली.

काय आहे प्रकरण?

पालघरमधील डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात कांदिवली येथील सुशीलगिरी महाराज, वाहन चालक निलेश तेलगडे आणि नाशिकच्या त्रंबकेश्वर येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिराचे पुजारी कल्पवृक्षगिरी महाराज हे गुजरातकडे चालले होते. पण, गुजरातची सीमा बंद असल्यामुळे त्यांना पोलिसांनी पुढे जाऊ दिले नाही. त्यामुळे ही गाडी 15 मिनिटाने मागे आली. गाडी जशी मागे आली तेव्हा तिथे अचानक लोकं जमा झाले. जवळपास हजार लोकं होती. त्यांच्या हातात लाठ्या काठ्या, कोयते आणि कुऱ्हाडी होत्या. काही कळायच्या आत लोकांनी या तिघांना मारहाण सुरू केली. 16 एप्रिल रोजी घडलेल्या हत्याकांडप्रकरणी तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा...सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण CBI च्या हाती, केंद्राकडून नोटिफिकेशन जारी

दुसरीकडे, सुप्रीम कोर्टात बुधवारी अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सुनावणी झाली. बिहारमध्ये नोंदवण्यात आलेल्या एफआयआरमध्ये रियाविरुद्ध गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकार चौकशीचा अहवाल पुढील तीन दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यात सर्व बाजू आपल्या लेखी उत्तरांत देण्याचे कोर्टानं आदेश दिले आहेत. यानंतर सुप्रीम कोर्टात आपला निर्णय देईल. कोण चौकशी करेल आणि कुठले राज्य करणार यावर निर्णय देईल. बिहार पोलिसांविरोधात तुम्ही कसे वागले याचं उत्तर द्या. पोलिसांविरोधात चौकशी अहवाल मागितला आहे. सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारला रेकॉर्डवरही आरोपपत्रे आणण्याचे आदेश दिले आहेत.

केंद्राचं म्हणणं आहे की, सुप्रीम कोर्टानं तपास कसा झाला याची तपासणी करावी. कोर्टाच्या चौकशीवर समाधानी नसेल तरच सीबीआय चौकशी, असंही तुषार मेहता यांना सुप्रीम कोर्टात सांगीतलं आहे. दुसरीकडे, महाराष्ट्र सरकार सर्व आरोपपत्र सुप्रीम कोर्टात सादर करण्यास सहमत आहे. पुढील सुनावणी 3 आठवड्यांनंतर होणार आहे.

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण आता CBI च्या हाती

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आता केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात CBI च्या चौकशीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. याबाबत नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहेत.

सीबीआयच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, केंद्र सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं की, बिहार सरकारने या प्रकरणाची CBI चौकशीची शिफारस केली होती. केंद्राने बिहार सरकारची शिफारस मान्य केली आहे. आता या प्रकरणाची चौकशी CBI करणार आहे.

रिया चक्रवर्तीसह 6 जणांवर गुन्हा...

सुशांत सिंहचे वडिल केके सिंह यांनी (वय-74) यांनी 28 जुलैला अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचे कुटुंबीय अशा सहा जणांविरुद्ध पाटणा येथील राजीव नगर पोलीसमध्ये एफआयआर नोंदवली आहे. सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा ठपका रिया चक्रवर्तीवर ठेवण्यात आला आहे. केके सिंह यांनी रियावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

हेही वाचा...कंगनाचा आदित्य ठाकरेंवर निशाणा, म्हणाली..आधी वडिलांना विचारा 7 प्रश्नांची उत्तरं

बिहार पोलीस या प्रकरणी चौकशीसाठी मुंबईत दाखल झाले होते. मात्र, बिहार सरकारने केंद्र सरकारकडे या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. रियाने आपलं करिअर घडवण्यासाठीच मे 2019 सुशांतशी मैत्री केली होती.

First published:
top videos

    Tags: Palghar, Supreme court