जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मोठी बातमी! कोव्हीड सेंटर घोटाळा प्रकरणात अखेर सुजित पाटकर ईडीच्या ताब्यात

मोठी बातमी! कोव्हीड सेंटर घोटाळा प्रकरणात अखेर सुजित पाटकर ईडीच्या ताब्यात

मोठी बातमी! कोव्हीड सेंटर घोटाळा प्रकरणात अखेर सुजित पाटकर ईडीच्या ताब्यात

सुजित पाटकर हे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याचं मानलं जातं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 20 जुलै, प्रणाली कापसे : मोठी बातमी समोर येत आहे, अखेर सुजित पाटकर यांना ईडीनं बुधवारी रात्री उशिरा ताब्यात घेतलं आहे. थोड्या वेळात त्यांना मुंबई सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे. सुजित पाटकर हे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याचं मानलं जातं. सुजित पाटकर यांच्यावर मुंबई महापालिकेतील कोव्हीड सेंटरमध्ये घोटाळ्याचा आरोप आहे. या प्रकरणात ईडीकडून चौकशी सुरू होती. अखेर सुजित पाटकर यांना रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांच्यासह आणखी दोघांना अटक केल्याची माहिती समोर येत आहे. Ajit Pawar And Uddahv Thackeray : उद्धव ठाकरेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट; म्हणाले, चांगलं… ईडीची छापेमारी दरम्यान काही दिवसांपूर्वीच सुजित पाटकर यांच्याशी संबंधित या प्रकरणात ईडीने राज्यात काही ठिकाणी छापे टाकले होते. मुंबईत पंधराहून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. बीएमसीचे वरिष्ठ अधिकारी, पुरवठादार आणि शहरात कोविड मशिन्स उभारण्यासाठी मदत करणाऱ्या लोकांच्या घरावर हे छापे टाकले गेले होते. अखेर या प्रकरणात आता ईडनं सुजित पाटकर यांना ताब्यात घेतलं आहे. त्यांना मुंबई सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात