मुंबई : मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे. मंत्रालयात तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या तरुणाने मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली. मात्र मंत्रालयाला लावलेल्या संरक्षक जाळीमुळे मोठा अनर्थ टळला. हा तरुण वरून पडल्यानंतर जाळीत अडकल्याने त्याचे प्राण वाचले आहे. या घटनेत तरुणाच्या डोळ्याला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. बापू नारायण मोकाशी असं या तरुणाचं नाव आहे. त्याने आत्महत्येचा प्रयत्न का केला याबाबतची माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही. या सर्व प्रकारामुळे काही काळ मंत्रालय परिसरात गोंधळ उडाला होता. तरुण मानसिक रुग्ण असल्याची माहिती पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार आत्महत्येचा प्रयत्न कराणारा हा तरुण मानसिक रुग्ण असल्याचं समोर आलं आहे. त्याने प्रेम प्रकरणातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर येत आहे. या तरुणाने यावेळी आपल्या घरच्यांवर देखील आरोप केले आहेत.
तरुणाचा धक्कादायक दावा दरम्यान हा तरुण मानसिक रुग्ण असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. या तरुणाने धक्कादायक दावा देखील केला आहे. माझ्या प्रेयसीवर बलात्कार करण्यात आला आहे. मी याबाबत उद्धव ठाकरे यांना चार पत्र देखील लिहीली मात्र काहीही करण्यात आलं नाही, असं या व्यक्तीचं म्हणणं आहे.