Home /News /maharashtra /

जळगाव हादरलं! आई-वडील शेतात, तीन बहिणी झोक्यात खेळत असताना अचानक काळाचा घाला....

जळगाव हादरलं! आई-वडील शेतात, तीन बहिणी झोक्यात खेळत असताना अचानक काळाचा घाला....

जळगाव जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घराच्या छताला बांधलेला साडीचा झोका तुटल्याने दीड वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाला आहे.

    नितीन नांदुरकर, प्रतिनिधी जळगाव, 19 जून : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घराच्या छताला बांधलेला साडीचा झोका तुटल्याने दीड वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाला आहे. संबंधित घटना ही एरंडोल तालुक्यातील सावदे प्र.चा. येथे घडली आहे. घराच्या छताला बांधलेल्या साडीच्या झोक्यात तीनही बहिणी खेळत होत्या. खेळता-खेळता अचानक हा झोका तुटला. यात तिघी बहिणींपैकी एकीचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाल्या आहेत. अचर्ना धनसिंग पावरा असं दीड वर्षाच्या मृतक बालिकेचं नाव आहे. सावदे प्र.चा. येथे धनसिंग शीला पावरा हे वास्तव्यास आहेत. ते 15 वर्षांपासून गावातील शेतकऱ्यांची शेती बटाईने करुन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. धनसिंग आणि त्यांची पत्नी हे आज सकाळी शेतात गेले होते. तर धनसिंग यांची आई आणि त्यांच्या तीन चिमुकल्या मुली घरी होत्या. या दरम्यान संबंधित दुर्दैवी घटना घडली. कच्च्या विटांच्या घरावर लोखंडी पाईपाला साडीद्वारे केलेल्या झोक्यात तीनही मुली खेळत होत्या. यावेळी अचानक साडीचा झोका तुटला. या घटनेत अर्चना पावरा या दीड वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाला. तर तिचे साडेतीन वर्षे आणि पाच वर्ष वयाच्या दोन्ही बहिणी गंभीर जखमी झाल्या. दोघींवर जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत अर्चना हिच्यावर सावदे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. (बारावीच्या विद्यार्थ्याला नग्न करून अमानुष मारहाण, लातूरमधील संतापजनक घटना) दरम्यान, संबंधित घटना घडली तेव्हा पीडितांच्या आजीने आक्रोश केला. आजीचा आक्रोशाचा आवाज ऐकून आजूबाजूचे आणि गावातील इरतर गावकरी आले. त्यांनी तातडीने मुलीच्या आई-वडिलांना शेतातून बोलावलं. या दरम्यान घरात आणि घराबाहेर गावकऱ्यांची गर्दी जमली होती. मुलींचे आई-वडील आल्यानंतर तातडीने तीनही मुलींना डॉक्टरकडे नेण्यात आलं. तीन बहिणींपैकी एका बहिणीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पावरा कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. मुलीच्या नातेवाईकांनी आणि इतर गावकऱ्यांनी जखमी असलेल्या दोन्ही मुलींना जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. तिथे दोन्ही बहिणींवर उपचार सुरु आहेत.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Jalgaon, Maharashtra News

    पुढील बातम्या