जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / जळगावमधील विद्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गंभीर प्रकार; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल

जळगावमधील विद्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गंभीर प्रकार; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल

जळगावमधील विद्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गंभीर प्रकार; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल

जळगावमधील विद्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • -MIN READ Jalgaon,Maharashtra
  • Last Updated :

नितीन नांदूरकर, प्रतिनिधी जळगाव, 13 जानेवारी : शाळेची फी न भरल्यामुळे जळगावमध्ये विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीत शाळेच्या बाहेर बसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर समोर आला आहे. जळगावमधील विद्या इंग्लिश मीडियम स्कूल शाळेत हा गंभीर प्रकार घडला. याप्रकरणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत शिक्षण विभागाकडून अहवाल मागवला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - शाळेची फी न भरल्याच्या कारणावरून विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीत शाळेच्या बाहेर बसवल्याचा धक्कादायक प्रकार जळगावमधील विद्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये समोर आला आहे. याबाबत पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटण्याचा प्रयत्न केला असता जोपर्यंत फी भरणार नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना वर्गात बसू दिल्या जाणार नसल्याचे शाळा प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे, असा आरोप पालकांनी केला आहे. जिल्हाधिकारी काय म्हणाले -  तसेच शाळा प्रशासनाविरोधात पालकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी शिक्षण विभागाकडे याबाबत अहवाल मागवला आहे. माझ्याकडे तक्रार आली होती की, काही मुलांना थंडीत सकाळी बाहेर बसवण्यात आले. त्यासाठी आम्ही याबाबतचा अहवाल शिक्षण विभागाकड़ून मागवला आहे. तो आल्यावर कायदेशीर पद्धतीने हे प्रकरण सोडवले जाईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

जाहिरात

हेही वाचा - 6 5 वर्षाच्या वृद्धाचा मेहुण्याच्या पाच वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; एक फोन कॉल अन्.. थंडीने आणलं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, चांद्यापासून बांद्यापर्यंत पिकांवर रोगाचं सावट - जानेवारीच्या सुरूवातीपासून राज्यात थंडीत वाढ झाली आहे. राज्यात बहुतांश जिल्ह्यात थंडीच्या लाटेने नागरिक हैराण झाले आहेत. जनजीवन विस्कळीत होत आहे. दरम्यान याचा परिणाम शेतवरही दिसत आहे. मागच्या चार दिवसांपूर्वी धुके व ढगाळ हवामान यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांत चिंतेचे वातावरण निर्मिण झाले आहे. वातावरणातील बदलांमुळे शेतीतील विविध पिकांवर मावा, तुडतुडे, करपा आदींसह विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. यंदा खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात बहुतांश जिल्ह्यात अशीत परिस्थिती आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात