Home /News /maharashtra /

ऑफलाइन की ऑनलाइन परीक्षा? उज्ज्वल निकम यांनी घेतली विद्यार्थ्यांची बाजू, म्हणाले...

ऑफलाइन की ऑनलाइन परीक्षा? उज्ज्वल निकम यांनी घेतली विद्यार्थ्यांची बाजू, म्हणाले...

कोरोनाची लाट अजून ओसरली नाही. जशी काळजी घेतली पाहिजे तशी घेतली जात नाही.

कोरोनाची लाट अजून ओसरली नाही. जशी काळजी घेतली पाहिजे तशी घेतली जात नाही.

कोरोनाची लाट अजून ओसरली नाही. जशी काळजी घेतली पाहिजे तशी घेतली जात नाही.

सोलापूर, 31 जानेवारी : ऑफलाइन परीक्षा (offline exam) रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी (student protest) शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. पण, कोरोनाची परिस्थिती पाहता परीक्षा या ऑनलाइनच घेतल्या पाहिजे', अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम ( Ujjwal Nikam) यांनी दिली आहे. हिंदुस्थानी भाई म्हणून ओळख असलेल्या विकास पाठकने इंन्स्टाग्रामवर व्हिडीओ व्हायरल करून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर निदर्शनं करण्यास विद्यार्थ्यांना भाग पाडले. एवढंच नाहीतर विद्यार्थ्यांनी नागपूर, बीड आणि पुण्यातही घोषणाबाजी केली. या मुद्यावर उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. (कुत्र्याला तोंडाने श्वास द्यायला गेली व्यक्ती अन्...; पुढे काय घडलं पाहा VIDEO) 'आज ऑफलाइन काही गोष्टी सुरू आहे. काही गोष्टी ऑनलाइन करण्याची गरज आहे. कोरोनाची लाट अजून ओसरली नाही. जशी काळजी घेतली पाहिजे तशी काळजी घेण्यात येत नाही. लहान मुलांकरता कोरोना लस अद्याप उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे लहान मुलांसाठी ऑनलाइन शिक्षण सुरू असणे गरजेचं आहे' असं निकम म्हणाले. (या' महिलेच्या डोळ्यांत आहे जादू; अद्भुत डोळे ओळखतात दहा कोटी रंग; कसे ते वाचा) तसंच, 'आज विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे, सरकारने याबद्दल विद्यार्थ्यांची मागणी समजून घ्यायला हवी, आजच्या परिस्थितीत ऑनलाइन परीक्षा घेणे हे योग्य राहिल हे माझे व्यक्तिगत मत आहे. शासनाला हा निर्णय घ्यायचा आहे. कोरोना लस अजूनही पूर्णपणे विद्यार्थ्यांना दिली जात नाही. जोपर्यंत या मुलांना कोरोनाची लस दिली जात नाही. तोपर्यंत ऑनलाइनची परीक्षा असावी, असंही उज्ज्वल निकम म्हणाले. गृहमंत्र्यांनी दिले कारवाईचे आदेश दरम्यान, विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून जे आंदोलन केले आहे, ते योग्य नाही. महाराष्ट्रातला विद्यार्थी हा अभ्यास करणारा विद्यार्थी आहे. या विद्यार्थ्यांना काही भूमिका मांडायची होती तर त्यांनी पालकांमार्फत बोललं पाहिजे. या मागे कुठली तरी मोठी शक्ती आहे. मी पोलीस विभागाला सक्त आदेश दिले आहे की कारवाई करावी, असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं. 'दोन दिवसांपासून व्हिडीओ व्हायरल झाले आहे, त्यामधून विद्यार्थ्यांना भडकावण्यात आले. मुंबईमध्ये आंदोलन करायचे, नागपूरला आंदोलन करायचे हे ठरवून केलेले कृत्य आहे, यावर कडक कारवाई केली जाईल, असंही वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या