नाशिक, 26 सप्टेंबर: सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. राज्यभरात ठिकठिकाणी सरकारविरोधात एल्गार पाहायला मिळत आहे. तर, मराठा आरक्षण आंदोलनाचं नाशकात बिगुल वाजलं आहे. सर्व मराठा संघटना नाशकात एकाच छताखाली एकत्र आल्या आहेत. मराठा संघटनांच्या राज्यस्तरीय बैठकीला सुरुवात झाली आहे. मराठा आंदोलनाबाबत या बैठकीत काय निर्णय घेतला जातो, याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.
हेही वाचा...अजित पवार यांच्या बारामतीतील निवासस्थानासमोर मराठ्यांनी वाजवला ढोल
खासदार संभाजीराजे छत्रपती हे या बैठकीला उपस्थित आहेत. तर खासदार उदयनराजे भोसले यांचे प्रतिनिधी म्हणून यशराजे पाटील या बैठकीत सहभागी झाले आहेत. त्याबरोबर राज्यातील 22 जिल्ह्यांचे समन्वयक सहभागी झाले आहेत. मराठा आंदोलनाची रणनीती आखण्यासाठी ही महत्त्वाची बैठक असल्याचं बोललं जात आहे.
अजित पवार यांच्या बंगल्यासमोर मराठ्यांनी वाजवला ढोल
मराठा आरक्षण तत्काळ लागू करा, अन्यथा खुर्च्या सोडा, अशी मागणी करता शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील निवासस्थानासमोर सकल मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी 'ढोल बजाव' आंदोलन केलं. पोलिसांनी मराठा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
भिगवण मार्गावरील पीएनजी चौकातून सकल मराठा मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चात मराठा कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. या वेळी मराठा कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टसिंग, मास्कचा वापर केला. हातात भगवा झेंडा घेऊन 'एक मराठा लाख मराठा' अशा घोषणा देत मराठा आंदोलक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर एकत्र आले.
हेही वाचा..ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय, सुटी सिगारेट व बिडी विक्रीला राज्यात बंदी!
मराठा आरक्षण टिकवा, नाही तर मराठा समाजाचे खासदार, आमदार आणि मंत्र्यांनी राजीनामा द्या. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. मराठा आंदोलकांनी जवळपास एक तास अजित पवार यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केलं. मात्र. त्यानंतर पोलिसांनी मराठा आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maratha kranti morcha, Maratha reservation, Nashik, Protest for maratha reservation