• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांच्या घरावर दगडफेक

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांच्या घरावर दगडफेक

Stone pelting on Ashok Chavan house: राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांच्या घरावर दगडफेक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • Share this:
नांदेड, 1 सप्टेंबर : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या घरावर अज्ञातांकडून दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. अशोक चव्हाणांच्या नांदेड (Nanded) येथील घरावर ही दगडफेक झाली आहे. एका अनोळखी महिलने ही दगडफेक (Stone pelting) केली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरावर अज्ञात महिलेने दगडफेक केली आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. दगडफेक करणारी महिला कोण होती याची माहिती मिळू शकलेली नाहीये, मात्र ही महिला मनोरुग्ण असल्याचं बोललं जात आहे. या महिलेने केलेल्या दगडफेकीत अशोक चव्हाण यांच्या घराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या केबिनची काच फुटली आहे. या दगडफेकीत कुणालाही दुखापत झालेली नाहीये. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भाजप नगराध्यक्षाच्या विरोधात विनयभंगाची तक्रार, सोनोग्राफी सेंटरमध्ये अश्लील चाळे केल्याचा आरोप दगडफेकीच्या या घटनेनंतर अशोक चव्हाण यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ज्यावेळी या महिलेने दगड भिरकावण्यास सुरुवात केली त्यावेळी सुरक्षारक्षकांनी तिला रोखले. मात्र, एक दगड हा थेट सुरक्षा रक्षकांच्या केबिनवरील काचेवर लागला आणि काच फुटली. या महिलेने दगडफेक का केली या संदर्भात अद्याप स्पष्टता नाहीये. दरम्यान अशोक चव्हाणांच्या घराच्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत.
First published: