जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / भाजप नगराध्यक्षाच्या विरोधात विनयभंगाची तक्रार, सोनोग्राफी सेंटरमध्ये अश्लील चाळे केल्याचा आरोप

भाजप नगराध्यक्षाच्या विरोधात विनयभंगाची तक्रार, सोनोग्राफी सेंटरमध्ये अश्लील चाळे केल्याचा आरोप

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Obscene act in Sonography Center: सोनोग्राफी सेंडरमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या भाजपच्या नगराध्यक्षाच्या विरोधात तक्रार दाखल.

  • -MIN READ
  • Last Updated :

बीड, 1 सप्टेंबर : बीड जिल्ह्यातील धारूरचे भाजपचे नगराध्यक्ष डॉ स्वरूपसिंह हजारी (Dr. Swarupsingh Hajari) यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा (molestation case registered) दाखल करण्यात आला आहे. याप्रकारने राजकीय आणि आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. गर्भवती महिलेची सोनोग्राफी करायची असा कारण सांगून सोनोग्राफी सेंटरमध्ये अश्लील चाळे करत जातीवाचक बोलून विनयभंग केल्याचा हजारीवर आरोप आहे. डॉक्टर स्त्रीरोगतज्ज्ञ असून धारूरचा विद्यमान नगराध्यक्ष आहे. त्याच्या विरोधात डॉक्टर आणि व्यापारी असोसिएशनकडून हा गुन्हा खोटा असल्याचे सांगत तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी केली आहे. हा गुन्हा विरोधात आज असोसिएशनच्या सर्व डॉक्टरांनी आपले हॉस्पिटल बंद ठेवले असून व्यापारी असोसिएशन सुद्धा बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन गुन्हा तात्काळ गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे. यामुळे बीड जिल्ह्यात राजकीय वर्तुळात वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. बापरे ! मुंबईतील सोसायटीत बिबट्याचा वावर, परिसरात एकच खळबळ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण डॉ स्वरूपसिंह हजारी हे धारूर नगर पालिकेत विद्यमान नगराध्यक्ष पदावर आहे. तसेच स्त्रीरोगतज्ज्ञ असून धारूरमध्येच खाजगी दवाखाना चालवतो. काल दुपारी 19 वर्षाची गर्भवती तपासणीसाठी आली. तिला सोनोग्राफी करायची असा कारण सांगून सोनोग्राफी सेंटरमध्ये अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. तसेच जातीवाचक बोलला. हा प्रकार नातेवाईकांना सांगून गर्भवती थेट धारूर ठाण्यात पोहचली. तक्रार दिल्यानंतर डॉ. हजारी विरोधात विनयभंग व अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान डॉक्टर आणि व्यापारी असोसिएशनने हा गुन्हा खोटा असल्याचं सांगितल्याने नेमकं प्रकरण काय आहे याचा तपास पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: beed , crime
  • First Published :
जाहिरात
जाहिरात