जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कंपनीचा 20 लाखांचा चेक चोरून लावला चुना; मिरजमधील शिवसेना शहर प्रमुखाला अटक

कंपनीचा 20 लाखांचा चेक चोरून लावला चुना; मिरजमधील शिवसेना शहर प्रमुखाला अटक

कंपनीचा 20 लाखांचा चेक चोरून लावला चुना; मिरजमधील शिवसेना शहर प्रमुखाला अटक

Crime in Sangli: सांगली जिल्ह्यातील मिरज शहराच्या शिवसेना शहर प्रमुखाला एका चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

सांगली, 17 जुलै: सांगली जिल्ह्यातील मिरज शहराच्या शिवसेना (Shivsena) शहर प्रमुखाला (City Chief) एका चोरीच्या प्रकरणात (Theft Case) अटक करण्यात आली आहे. मिरज शहरातील एका कंपनीच्या जुन्या चेकबूक पुस्तकातून 20 लाख रुपये रक्कमेचा चेक चोरून त्यातील 15 लाख 17 हजार 205 रुपये लंपास केल्याचा आरोप मिरज शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे (Chandrakant Maingure) यांच्यावर आहे. याप्रकरणी पोलिसांनी मैंगुरे यांना अटक (Arrest) केली असून न्यायालयानं त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. याप्रकरणी मिरजेतील हनुमान मंदिर परिसरातील रहिवासी असलेले मधुकुमार यांनी मिरज शहरातील महात्मा गांधी चौकी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मधुकुमार यांच्या तक्रारीनंतर आरोपी चंद्रकांत मैंगुरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीनं एन रामकृष्ण नावाच्या कंपनीच्या जुन्या चेकबुकचा वापर करत ही रक्कम लंपास केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी शिवसेना शहर प्रमुखावर चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानं मिरजेत खळबळ उडाली आहे. हेही वाचा- आलिशान गाड्यांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; कंपनीच्या CEOसह तिघांना अटक टीव्ही9 ने दिलेल्या वृत्तानुसार, शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होताच, त्यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. पण न्यायालयानं त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. चंद्रकांत मैंगुरे यांना अटक केल्यानंतर शुक्रवारी त्यांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयानं चंद्रकात मैंगुरे यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास मिरज पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात