मुंबई, 17 जुलै: परदेशातून अमली पदार्थांची तस्करी किंवा मानवी तस्करीच्या अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. पण परदेशातून भारतात आलिशान गाड्यांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा (Luxury car smuggling racket) देशात पहिल्यांदाच पर्दाफाश करण्यात आला आहे. महसूल गुप्तचर संचालनालय (Directorate of revenue intelligence) मार्फत ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. मागील पाच वर्षांत परदेशातून तब्बल 20 आलिशान गाड्यांची भारतात तस्करी (20 luxury car smuggled) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी महसूल गुप्तचर संचालनालयानं तीन आरोपींना बेड्या ठोकल्या (3 Arrest) आहेत.
याप्रकरणी महसूल गुप्तचर संचालनालयानं तीन लोकांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये गुरुग्राम स्थित आलिशान कारची डिलरशीप करणाऱ्या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा देखील समावेश आहे. संबंधित आरोपी आपलं राजकीय वजन वापरून आलिशान गाड्यांची भारतात तस्करी करत होते. मागील पाच वर्षांच्या कालावधीत आरोपींनी तब्बल 20 महागड्या आलिशान गाड्यांची भारतात छुप्या पद्धतीनं तस्करी केली आहे.
Mumbai: Directorate of Revenue Intelligence busts luxury car smuggling racket involving use of diplomatic privileges. 3 people incl CEO of a Gurugram based luxury car dealership arrested. 20 vehicles smuggled into India in last 5yrs, resulting in duty evasion of more than Rs 25cr pic.twitter.com/tcPVSi1PzG
— ANI (@ANI) July 17, 2021
हेही वाचा-सायलेन्सर चोरून लाखोंची कमाई करणारी टोळी गजाआड, कारण ऐकून पोलीसही अचंबित
आरोपींनी संबंधित वीस महागड्या आलिशान गाड्यांची भारतात तस्करी करत तब्बल 25 कोटी रुपयांचा कर बुडवला आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाकडून संबंधित आरोपींची चौकशी केली जात आहे. चौकशीतून आणखी बरीच धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Car, Crime news, Mumbai, Smuggling