Home /News /maharashtra /

दिड वर्षांनंतर उघडले मंदिराचे दरवाजे...राज्यात भक्तिमय वातावरण, शिर्डीतील काकड आरतीचा व्हिडिओ

दिड वर्षांनंतर उघडले मंदिराचे दरवाजे...राज्यात भक्तिमय वातावरण, शिर्डीतील काकड आरतीचा व्हिडिओ

आज घटस्थापना.. आजपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली आहे. आजपासून राज्यातल्या सर्व मंदिराची दारं उघडण्यात आली आहेत.

  मुंबई, 07 ऑक्टोबर: आज घटस्थापना.. आजपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली आहे. याच मुहूर्तावर कोरोनामुळे बंद झालेली धार्मिक स्थळे आजपासून भक्तांसाठी खुली झाली आहेत. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. त्यानंतर आजपासून राज्यातल्या सर्व मंदिराची दारं उघडण्यात आली आहेत. आजसकाळपासून मुंबई, पुणे, शिर्डी, पंढरपूर, कोल्हापूर आणि तुळजापूर या आणि अशा सर्व ठिकाणावर भक्तीमय वातावरण दिसत असल्याचं चित्र आहे. अहमदनगर जिल्ह्यात शिर्डीचे साई बाबा मंदिर, मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर, मुंबादेवी मंदिर, शेगावचे गजानन महाराज मंदिर, पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर, कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर, तुळजापुरामधील भवानी मातेचं मंदिर सर्वसामान्यांसाठी खुली केलीत. हेही वाचा-  आता फोनमधूनच निघणार ड्रोन कॅमेरा, वर उडवून काढता येणार फोटो
   मंदिराची दारं जरी भक्तांसाठी खुली करण्यात आली असली तरी मंदिरात आरोग्याच्या नियमांचं पालन झालं पाहिजे. तसंच मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर झाला पाहिजे, असं नियम राज्य सरकारनं मंदिर प्रशासनाला दिलेत.
  शिर्डीतील साईबाबांचे मंदिर आजपासून भाविकांना दर्शनासाठी सुरू करण्यात आले आहे. मोठा उत्साह भाविकांमध्ये दिसत असून शिर्डी नगर भाविकांच्या स्वागतासाठी सजली आहे. शिर्डीतील काकड आरतीचा व्हिडिओ श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे दार पहाटे चार वाजता उघडण्यात आले. दार उघडल्यानंतर देवाचे नित्योपचार सुरु झालेत. गेल्या दीड वर्षापासून बंद असलेले श्री विठ्ठलाचे मंदिर आज घटस्थापनेच्या मुहुर्तावर उघडले. सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत भाविकांना मुख दर्शनासाठी मंदिर खुलं राहणार आहे. पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये राज्यमंत्री दत्तात्रय भरणे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते मंदिर उघडण्यात आलं. त्यानंतर पहिली आरती करण्यात आली. घटस्थापनेच्या मुहूर्तावर कोल्हापूरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराचे दरवाजे उघडले. पहाटे पाचच्या सुमारास दोन दरवाजे उघडण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थ पवार आणि जयंत पाटील, सुनिल केदारे यांनी आज सिध्दीविनायक मंदिरात जाऊन गणपतीचं दर्शन घेतले.
  Published by:Pooja Vichare
  First published:

  Tags: Dagaduseth halwai ganpati temple, Navratri, Temple

  पुढील बातम्या