**भिवंडी, 20 जुलै :**राज्यभरात पावसाने जोरदार (maharashtra rain) हजेरी लावली आहे. ठिकठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला आहे. अशा परिस्थितीत पाण्यात उतरू नका, अशी सूचना वारंवार दिली जाते . पण, काही महाभाग हे नको ते धाडस करता आणि जीवाशी खेळ करतात. पाण्याच्या अंदाज न आल्यामुळे अनेक जणांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. पण, भिवंडीतील (bhiwandi) एक महाभाग तरुण विजेच्या खांबावर चढून पुराच्या पाण्यात उडी मारत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. भिवंडी परिसरात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीनाका येथील नदीला पूर आला आहे. खाडीला पूर आला असताना एका तरुणाने विजेच्या पोलवर चढून उंचावरून अतिवेगाने वाहणाऱ्या पाण्यात उडी मारून पोहण्याचा आनंद घेतला.
भिवंडीतील नदीनाका इथं पोलवर चढून पुराच्या पाण्यात उडी, तरुणाचा व्हिडीओ व्हायरल pic.twitter.com/sIrvQCypqN
— News18Lokmat (@News18lokmat) July 20, 2021
काळजाचा ठोका चुकवणार हा प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाण्यात उडी मारल्यानंतर पुन्हा हा तरुण खांबाजवळ येतो आणि परत खांबावर चढतो. त्यानंतर पुन्हा तो पाण्यात उडी मारतो.
VIDEO काढताना पाहून चवताळला हत्ती; धावत आला आणि…; पाहूनच भरेल धडकी
या तरुणाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. असा जीवघेणा स्टंट जीवावर बेतू शकतो त्यासाठी पालक आणि प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. पाण्याच्या प्रवाहाविरोधात पोहणे तरुणांच्या जीवावर बेतले दरम्यान, रत्नागिरी (ratnagiri) जिल्ह्यातील संगमेश्वर (Sangameshwar) तालुक्यात पाण्याचा प्रवाह वेगवान असतांना पोहण्यासाठी उतरलेल्या सहा मुलांपैकी दोघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली होती. सदरची घटना धामापूर घारेवाडी येथे घडली आहे. संगमेश्वर तालुक्यातील धामापूर घारेवाडी इथं आज दुपारी ३.३० च्या सुमारास शैलेश दत्ताराम चव्हाण (वय 32), चेतन सूर्यकांत सागवेकर (18) दोघेही राहणार धामापूर घारेवाडी हे गायमुख परिसरात वाहत्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले असता पाण्याबरोबर वाहत जावून या दोघांचाही बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक उदयकुमार झावरे यांनी दिली.