जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / घर कसं चालवायचं? एसटी कर्मचाऱ्याने विष पिऊन संपवलं आयुष्य, नांदेडमधला तिसरा बळी

घर कसं चालवायचं? एसटी कर्मचाऱ्याने विष पिऊन संपवलं आयुष्य, नांदेडमधला तिसरा बळी

 विलीनीकरणाच आंदोलन सुरू झाल्यापासून नांदेड जिल्ह्यात हा तिसरा बळी गेला.

विलीनीकरणाच आंदोलन सुरू झाल्यापासून नांदेड जिल्ह्यात हा तिसरा बळी गेला.

विलीनीकरणाच आंदोलन सुरू झाल्यापासून नांदेड जिल्ह्यात हा तिसरा बळी गेला.

  • -MIN READ
  • Last Updated :

नांदेड, 22 मार्च : एसटी महामंडळाचे (ST Corporation) राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करून घेण्याच्या मागणीवर एसटी कर्मचारी अजून ठाम आहे. राज्य सरकारने (mva government) आणि समितीच्या आयोगाने अहवाल दिल्यानंतरही एसटी कर्मचारी मागे हटण्यास तयार नाही. तर दुसरीकडे, एसटी कर्मचाऱ्यांचे आत्महत्या (ST employee commits suicide) सत्र सुरूच आहे. नांदेडमध्ये आणखी एका एसटी कर्मचाऱ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगाधर येवतीकर (वय 48) असं मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड आगारात गंगाधर येवतीकर चालक म्हणून कार्यरत होते.  मुखेड शहरातील कंधार फाटा येथील राहत्या घरी त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात येवतीकर सहभागी होते. मागील तीन चार महिन्यापासून पगार नसल्याने आर्थिक परिस्थिती बिकड झाली होती. ( Google वर हे तीन शब्द लिहा, लगेच समजेल तुमचा Internet Speed; सोपी-सिक्योर पद्धत ) याच निराशेतून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी देखील सिडको येथील एका चालकाने आत्महत्या केली होती. तर एका कर्मचाऱ्याचा मेंदूच्या रक्तस्त्रावामुळे मृत्यू झाला होता. विलीनीकरणाच आंदोलन सुरू झाल्यापासून नांदेड जिल्ह्यात हा तिसरा बळी गेला. ( आधी अपहरणाचा प्रयत्न, मग भररस्त्यात..; पाकिस्तानात 18 वर्षीय हिंदू तरुणीची हत्या ) दरम्यान, एसटी विभागाला शासनात विलीनीकरण करावे  या मागणीसाठी गेल्या चार महिन्यांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. तर काहींवर बडतर्फी तसंच निलंबनाची कारवाई करण्यात येईल उपासमारीची वेळ आली आहे. तर हायकोर्टाने स्थापन केलेल्या समितीने एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यास नकार कळवला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर परत यावे असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. अलीकडे राज्याच्या अर्थसंकल्पात एसटी महामंडळासाठी भरीव तरदूर करण्यात आली आहे, याबद्दलची घोषणाही अजित पवार यांनी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात