जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / नीरज चोप्राने रचला इतिहास, 'रुपेरी' कामगिरीमुळे जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील पदकांचा दुष्काळ संपला

नीरज चोप्राने रचला इतिहास, 'रुपेरी' कामगिरीमुळे जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील पदकांचा दुष्काळ संपला

नीरज चोप्राने रचला इतिहास, 'रुपेरी' कामगिरीमुळे जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील पदकांचा दुष्काळ संपला

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहचत नीरच चोप्राने सिल्वर मेडलवर आपलं नावं कोरलं आहे.नीरज चोप्राने भारताला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देऊन इतिहास रचला.

  • -MIN READ
  • Last Updated :

World Athletics Championships 2022: भालाफेकपटू नीरज चोप्रामुळे पुन्हा एकदा भारतीयांची मान अभिमानाने उंच झाली आहे. जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहचत नीरज चोप्राने सिल्वर मेडलवर आपलं नावं कोरलं आहे.नीरज चोप्राने भारताला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देऊन इतिहास रचला. नीरज चोप्राने 18 व्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकच्या अंतिम फेरीत रौप्य पदक जिंकले आहे. नीरजने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकच्या अंतिम फेरीत 88.13 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नांसह रौप्य पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू बनून इतिहास रचला. अँडरसन पीटर्सने 90.46 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नाने सुवर्णपदक जिंकले. बेन स्टोक्सनंतर भारतीय खेळाडूही देणार निवृत्तीचा धक्का, शास्त्रींनी सांगितली Inside Story नीरजची अंतिम फेरीतील कामगिरी नीरजने फाऊल थ्रोने सुरुवात केली आणि दुसऱ्या प्रयत्नात 82.39 मीटर भाला फेकला. यावेळी तो बराच मागे होता. यानंतर तिसऱ्या प्रयत्नात नीरजने 86.37 मीटर भाला फेकला तर चौथ्या प्रयत्नात 88.13 मीटर भाला फेकत दुसऱ्या क्रमांकांवर झेप घेतली. नीरजचा पाचवा प्रयत्न फाऊल ठरला आणि शेवटच्या प्रयत्नात त्याला 90 मीटर भाला फेकता आला नाही कारण हा प्रयत्नही फाऊल झाला. टीम इंडिया इतिहास घडवण्याजवळ, पाकिस्तानचा विक्रम मोडणार गब्बर’ची सेना! 39 वर्षांचा दुष्काळ संपला 18 वर्षांपूर्वी जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने कांस्यपदक जिंकले होते. 2003 मध्ये अनुभवी अॅथलीट अंजू बॉबी जॉर्जने लांब उडीत भारताला कांस्य पदक मिळवून दिले होते. मात्र नीरज चोप्राने एक पाऊल पुढे जात आज देशाला सिल्वर मेडल मिळवून दिलं आहे. जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप प्रथम 1983 मध्ये आयोजित करण्यात आली होती. तेव्हापासून भारताला या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकता आलेले नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: sports
  • First Published :
जाहिरात
जाहिरात