नितीन बनसोडे, प्रतिनिधी लातूर, 17 जानेवारी : लातूरमध्ये एसटी महामंडळाच्या बसला भीषण अपघात झाला आहे. लातूरहून पुण्याकडे जाणाऱ्या एसटी बसला अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या अपघातात 15 प्रवासी जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लातूरहून पुण्याकडे एसटी महामंडळाची बस रवाना झाली होती. लातूर जिल्ह्यातल्या बोरगाव काळे पाटीनजीक निलंगा येथून पुण्याला जात असलेल्या एसटी बस अपघात झाला. बस रस्त्यावरून खाली उतरल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. (भिर्रर्र डोळ्यात साठवली अन् मृत्यूने मिठी मारली, अमरावतीत 4 जणांचा मृत्यू) मुरुडजवळ बस पोहोचली असता चालकाने बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या खाली उतरली. रस्त्याच्या बाजूला असलेल्या छोट्याशा पुलावरून बस खाली धडकली. अचानक झालेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. या अपघातात बसमधील 15 जण जखमी झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. जखमी प्रवाशांवर लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. मर्सिडीजची दुचाकीला धडक, दोन तरुण ठार दरम्यान, नाशिककडे भरधाव जाणाऱ्या मर्सिडीज कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोन युवक जागीच ठार झाले, तर एकजण गंभीर जखमी झाला. पिंपळकोठा गावाजवळील महामार्गावर हा अपघात झाला. (शाळेत पोहोचण्याआधीच मृत्यूनं गाठलं; कारमधून कामासाठी निघालेल्या महिला प्रिंसिपलचा दुर्दैवी अंत) अपघातानंतर मर्सिडीज चालक आणि अन्य दोघांना ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली. रस्त्यावरून जाणाऱ्या काही वाहनचालकांनी कारचालक व दोघा प्रवाशांची जमावाच्या तावडीतून सुटका केली. पिंपळकोठा येथील नितीन जामसिंग पाटील, घनश्याम भानुदास बडगुजर हे दोघे दुचाकीने घरी जात होते. तर नारायण धनसिंग पाटील हा युवक रस्त्याच्या कडेने पायी शेतात जात होता. पिंपळकोठा जवळील नाल्याजवळ मर्सिडीजने दुचाकीला समोरून धडक दिली. त्यामुळे तर नितीन पाटील व घनश्याम बडगुजर हे दोघे ठार झाले. तर नारायण पाटील गंभीर जखमी झाला. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.