मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ST बस थेट नाल्यात जाऊन धडकली, चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात

ST बस थेट नाल्यात जाऊन धडकली, चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात

लासलगाव येथून चांदवडकडे भरधाव वेगाने जाणारी एमएच-12, सीएच- 7578 ही एसटी बस पिंपळस गावाजवळ आल्यानंतर चालकाचं नियंत्रण सुटलं.

लासलगाव, 29 फेब्रुवारी : एसटी बसच्या अपघाताचे सत्र सुरूच असून आज दुपारी लासलगाव डेपोच्या एसटीला अपघात भीषण अपघात झाला. या अपघातात 10 ते 15 प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी चांदवडच्या रुग्णालयात पाठवण्यात आलं. लासलगाव येथून चांदवडकडे भरधाव वेगाने जाणारी एमएच-12, सीएच- 7578 ही एसटी बस पिंपळस गावाजवळ आल्यानंतर चालकाचं नियंत्रण सुटलं. पाहता-पाहता एसटी रस्ता सोडून खाली नाल्यात उतरली आणि पलटी झाली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे एसटी मधील प्रवाशांचा गोंधळ उडून भीती पसरली. एसटीत काही महिला आणि लहान मुलेदेखील होती. अपघातानंतर लहान मुलांनी तर जोरजोरात आरडाओरडा करून रडायला सुरुवात केली होती. त्यांचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना बाहेर काढले. एसटीत सुमारे 20 ते 25 प्रवासी होते. त्यापैकी 10 ते 15 प्रवाशांना किरकोळ मार लागला आहे. केवळ नशीब बलवत्तर होते, म्हणून एसटीचा मोठा अपघात झाली नाही. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. गटारात पडलेल्या भाज्या विकत होता विक्रेता, किळसवाणा VIDEO व्हायरल दरम्यान, महाराष्ट्रात खेड्यापाडी सुरक्षित प्रवास म्हणून लोक एसटीने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. मात्र गेल्या काही काळामध्ये एसटी बसच्या अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचं काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
First published:

Tags: Accident, Nashik

पुढील बातम्या