जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ssc exam : विद्यार्थी परीक्षेला पोहोचले अन् मधमाशांनी केला हल्ला, 13 जण जखमी

ssc exam : विद्यार्थी परीक्षेला पोहोचले अन् मधमाशांनी केला हल्ला, 13 जण जखमी

ssc exam : विद्यार्थी परीक्षेला पोहोचले अन् मधमाशांनी केला हल्ला, 13 जण जखमी

बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील गजानन कॉन्व्हेंट शाळेत ही घटना घडली.

  • -MIN READ
  • Last Updated :

राहुल खंदारे, प्रतिनिधी बुलडाणा, 28 मार्च : राज्यात कोरोनाची लाट ओसरल्यामुळे सर्व शाळा महाविद्यालय सुरू झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या दहावीच्या परीक्षा (ssc exam in maharashtra) सद्धा सुरू आहे. पण, बुलडाण्यात (buldhana) पेपर सुरू असताना मधमाशांनी हल्ला (bee attack) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मधमाशांच्या हल्ल्यात 13 विद्यार्थी जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी दाखल केले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील गजानन कॉन्व्हेंट शाळेत ही घटना घडली. आज दहावीचा पेपर असल्याने विद्यार्थी गजानन कॉन्व्हेंट या शाळेत पेपर देण्यासाठी दाखल झाले होते. सकाळी वेळेवर पेपर सुरू होणार म्हणून सर्व विद्यार्थी वेळेवर हजर होते. पण अचानक अचानक मधमाश्याने विद्यार्थ्यांवर हल्ला चढवला. त्यामुळे नेमकं काय घडतंय हे कळायला मार्ग नव्हता. विद्यार्थ्यांची एकच धावपळ उडाली. ( Gold Rate Today: सोने-चांदी दरात घसरण, तपासा 10 ग्रॅमचा आजचा भाव ) मधमाशांचा हल्ला रोखण्यासाठी विद्यार्थी इकडे तिकडे पळत सुटले होते. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.  मधमामाश्यांच्या हल्ल्यात तब्बल 13 विद्यार्थी जखमी झाले आहेत. ( IPL 2022: दोन भावात आज होणार काट्याची टक्कर, या टीमला 3 वेळा बनवले चॅम्पियन ) या विद्यार्थ्यांना उपचारार्थ शेगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत. विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मधमाशांचा हल्ला झाल्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात