जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / विकास दुबेच्या एन्काऊंटरवर काय म्हणाले विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम

विकास दुबेच्या एन्काऊंटरवर काय म्हणाले विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम

विकास दुबेच्या एन्काऊंटरवर काय म्हणाले विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम

उत्तर प्रदेशातीस कुख्यात गँगस्टर विकास दुबे हा पोलिस एन्काऊंटरमध्ये ठार मारला गेला.

  • -MIN READ
  • Last Updated :

जळगाव, 10 जुलै: उत्तर प्रदेशातीस कुख्यात गँगस्टर विकास दुबे हा पोलिस एन्काऊंटरमध्ये ठार मारला गेला. हे अत्यंत चांगलं झालं मात्र दुर्दैवाने या एन्काऊंटरबाबत अनेक प्रश्न निर्माण करत काही व्यक्ती राजकारण करत आहेत याच दुःख होत असल्याची प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे. उज्ज्वल निकम यांनी सांगितलं की, विकास दुबे याचा एन्काऊंटर झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार याबाबत ज्युडिशनाल इन्क्वायरी सुरू आहे. या चौकशीत हा एन्काऊंटर बनावट की खरा होता, हे समोर येईल. परंतु तोपर्यंत पोलिसांचे मनोबल आपल्याला तोडता येणार नाही. हेही वाचा… Vikas Dubey Encounter: वडील म्हणाले, बरं झालं ठार मारलं, अंत्यविधीलाही नाही जाणार मात्र, काही लोक जरी म्हणत असले की, विकास दुबे हा उज्जैनला शरण आला होता. पण शरण आलेली व्यक्ती पोलिसांवर गोळीबार का करेल? पण त्या लोकांना हे माहिती नाही की विकास दुबे हा सराईत गुन्हेगार होता. लोकांच्या डोळ्यात धूळ फेकणं आपल्या बलम प्रयोगामुळे खटल्यातून सुटका करून घेणे. म्हणून उत्तर प्रदेशमध्ये तो जणू बाहुबली झाला होता. आठ पोलिस कर्मचाऱ्यांना मारल्यानंतर तो उज्जैनला पळून गेला. याला कारण यात राजकारणही असेल किंवा राजकीय लोक किंवा एक्झिक्यूटिव्ह लोक यांच्याशी त्याचे साटेलोटे ही असेल. परंतु आज विकास दुबे मारला गेला याचे सामान्य जनतेला निश्चित आनंद झाला आहे. परंतु हा एन्काऊंटर खरा होता की खोटा होता याची शहानिशा होणे देखील गरजेचं आहे. कारण लोकांचा न्यायदेवतेवरील विश्वास कमी होता कामा नये. दरम्यान, 8 पोलिसांची हत्या करणाऱ्या विकास दुबेला कानपूर येथे घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या ताफ्याला अपघात झाला. या अपघातात पोलिसांची गाडी उलटी झाली. त्यात पोलिसांसह विकास दुबे ही देखील जखमी झाला. मध्यभागी बसलेल्या विकासनं पोलिसांची बंदूक हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. यात विकास दुबेचा मृत्यू झाला. पोलिसांच्या ताफ्याला सकाळी 6.15 वाजता झालेल्या अपघातादरम्यान नेमकं काय घडलं? विकास दुबेचा एन्काउंटर झाला की तो पूर्वनियोजित होता, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. काय आहे घटनाक्रम मध्य प्रदेशातील उज्जैन इथे गुरुवारी सकाळी महाकाल मंदिरातून विकास दुबेच्या मुसक्या आवळण्यात आल्या. संध्याकाळी पोलिसांकडून त्याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर विकास दुबेला उत्तर प्रदेश पोलिसांच्या हवाली करण्यासाठी उज्जैन इथून कानपूरच्या दिशेनं प्रवास सुरू झाला. हेही वाचा… मुंबई पोलिस दलात पुन्हा एकदा खांदेपालट, 9 पोलिस उपायुक्तांच्या बदल्या वेगानं घडामोडी घडत असतानाच अचानक शुक्रवारी सकाळी 6.15 च्या सुमारास बर्रा पोलिस स्टेशन परिसरात एसटीएफच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला. या अपघातादरम्यान गाडी उलटी झाली. या गाडीमध्ये विकास दुबे जीमध्ये मध्यभागी बसला होता. त्यानं बाजूच्या पोलिसाची बंदूक हिसकवून जखमी अवस्थेत पळ काढण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी पलटी झालेल्या गाडीतून विकास दुबेला पळताना पाहिलं. पोलिसांनी विकास दुबे याला सरेंडर करण्याचे आदेश दिले. मात्र, त्यानं ऐकलं नाही. उलट त्यांनं पोलिसांच्या दिशेनं गोळीबार सुरू केला. पोलिसांनी स्वबचावासाठी केलेल्या गोळीबारात विकास दुबे ठार मारला गेला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात