नंदूरबार , 21 डिसेंबर : नवीन वर्षाची चाहुल आता सर्वांनाच लागली आहे. वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात अनेकांना ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात. या सुट्टीमध्ये एकमेकांच्या घरी खाण्यांची मैफील जमते. या मैफलीची लज्जत वाढवण्यासाठी पदार्थही स्पेशल हवा. या पार्टीमध्ये करण्यासाठी आम्ही तुम्हाला खानदेशातील वांग्याच्या भरीताची रेसीपी सांगणार आहोत. नंदूरबार जिल्ह्यातील शहादाच्या स्मिता पाटील यांनी ही खास रेसिपी सर्वांना सांगितली आहे. साहित्य 1)दोन भरीताची वांगी - (500 ग्रँम.) 2) कांदा-एक मोठा 3)कांद्याची पात 150 ग्रँम. 4)हिरवी मिरची-सहा ते सात. 5)लसूण कापळ्या 10-12. 6)जीरे एक- चमचा. 7)मीठ -चवीपुरते. 8)मेथी पाला-एक वाटी. 9)कोथींबीर चिरलेली-एक वाटी. लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली आणि…मुंबईकरांना मिळाला नवा पदार्थ! पाहा Video भरीत बनवण्याची पद्धत सर्वप्रथम भरीताची वांगी स्वच्छ धुऊन त्याला कापडाने पुसून तेल लावावे. ते विस्तवावर भाजले तर फार चांगले, परंतु विस्तव नसला तर गॅस शेगडीवरही भाजले तरीही चालेल. चांगल्यापैकी वांगी भाजल्यानंतर त्याला ताटात ठेवावे .वांगी भाजली ,तशीच मिरची ही भाजून घ्यावी. त्यानंतर वांगी सोलून घ्यावी आणि त्याला त्यांना चांगल्याप्रकारे चुरून एकजीव करावं . लसूण, भाजलेली हिरवी मिरची ,जिरे ,अद्रक यांना खलबत्त्यात कुटून घ्यावं. ते मिश्रण भाजलेल्या भरीतच्या वांग्याच्या सारणात एकजीव करून घ्यावे. कांदा बारीक चिरून घ्यावा.कांद्याची पात ही चिरून घ्यावी.आता फोडणीसाठी कढईत तेल टाकून मंद आचेवर ठेवावी. त्यात मोहरी टाकावी. तडका आल्यावर बारीक चिरलेला कांदा टाकावा. कांदा गुलाबी झाल्यावर कांद्याची पात, मेथीची भाजी त्यात टाकून फ्राय करावी.नंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून मग त्यात भरीत चे सारण टाकून फ्राय करून घ्यावे. त्यावर बारीक चिरलेली काथींबीर टाकून भरीत तयार होईल. शेगावची फेमस कचोरी नागपुरात, तळून गरमागरम होते सर्व्ह, Video हे भरीत कळण्याची किंवा बाजरीची भाकरी अथवा चपाती सोबत खाल्ले जाते. पाहुण्यांच्या सरबराई करण्यासाठी हा अतिशय चंगला मेनू आहे. या पद्धतीचे स्पेशल भरीत खाल्ल्यानंतर तो तुम्हाला ‘अन्नदाता सुखी भव’ असा आशीर्वाद नक्की देईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.