मुंबई, 13 डिसेंबर : तुम्ही वडापाव, मसालापाव हे प्रकार अनेकदा खाल्ले असतील.
मुंबईच्या
प्रत्येक भागात मिळणाऱ्या वडापावची एक खासियत आहे. पण, तुम्ही कधी बटर चिकन पाव खाल्ला आहे का? चिकन मसाला, पाव आणि बटर हे पदार्थ वापरून बटर चिकन पाव बनवला जातो. लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्यानंतर जितेंद्र वाघेला या तरुणाने हा प्रकार सुरू केला आहे. कसा बनवतात बटर चिकन पाव? बटर चिकन पाव मध्ये त्यात स्टफ केला जाणारा चिकन मसाला महत्वाचा पदार्थ आहे. चिकन,कांदा, टोमॅटो, मसाले यांचा वापर करून चिकन मसाला बनवला जातो. पावात स्टफ करून त्याला भरपूर बटर लावून गरम केला जातो. त्यानंतर ठेचा, केचप सोबत तो खायला देण्यात येतो. नोकरी गेली आणि… जितेंद्र एका पॅथोलॉजी लॅबमध्ये कामाला होता. लॉकडाऊनमध्ये त्याची नोकरी सुटली आणि त्याने वडापावचा ठेला सुरु केला. वडापावला लोकांचा खुप चांगला प्रतिसाद मिळत असे. पण, ‘काहीतरी नवीन बनव’ अशी ग्राहकांची मागणी होती. या मागणीवर काही दिवस विचार केल्यानंतर जितेंद्रला बटर चिकन पाव बनवण्याची कल्पना सुचली. त्याचबरोबर जम्बो चिकन मोमोज, स्पेशल बटर चिकन पाव विकायलाही त्यानं सुरुवात केली.
वडापावचा ‘जुगाडी अड्डा’ एकाच ठिकाणी आहेत 30 पेक्षा जास्त पर्याय, Video
काय आहे किंमत? बटर चिकन पाव सुरुवातीला 15 रुपयांना मिळत होता मात्र महागाई वाढली व त्यामुळे जितेंद्रने याचा दर वाढवला आहे. आता बटर चिकन पाव 20 रुपयांना मिळतो तसंच जम्बो मोमोज सुद्धा 20 रुपयांना मिळतात. स्पेशल बटर चिकन पावची किंमत 40 रुपये आहे. तसंच वर्षातून 3-4 वेळेस बटर चिकन पाव 10 रुपयांना विकला जातो. सोशल मीडियावर तो वेगवेगळ्या ऑफरची माहिती अपडेट करत असतो.
गुगल मॅपवरून साभार
कुठे मिळतो बटर चिकन पाव? दादर रेल्वे स्थानकाला उतरल्यावर पूर्व दिशेला बाहेर आले की हिंदमाता चौकाकडे सरळ जाताना गौतम नगर भागात हा बटर चिकन पाव मिळतो. खावय्यांची हा पदार्थ खाण्यासाठी नेहमीच गर्दी जमलेली असते. संपूर्ण मुंबई पालथी घातली तरी ‘असा वडापाव’ मिळणार नाही, पाहा Video अधिक माहितीसाठी संपर्क जितेंद्र वाघेला : 98707 66399 ,