जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Street Food : शेगावची फेमस कचोरी नागपुरात, तळून गरमागरम होते सर्व्ह, Video

Street Food : शेगावची फेमस कचोरी नागपुरात, तळून गरमागरम होते सर्व्ह, Video

Street Food : शेगावची फेमस कचोरी नागपुरात, तळून गरमागरम होते सर्व्ह, Video

थेट शेगावमध्ये तयार केलेली कचोरी नागपुरात तळून गरमागरम खाण्यासाठी दिली जाते.

  • -MIN READ Local18 Nagpur,Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

    नागपूर, 10 डिसेंबर : कचोरी हे नाव जरी उच्चारले तरी तोंडी आपसूक येणारे नाव म्हणजे शेगावची कचोरी. शेगावच्या श्री संत गजानन महाराजांच्या नगरीतील या कचोरीची विशिष्ट पद्धत आणि चवीमुळे कचोरीचा लौकिक देशभर पसरला आहे. हीच अस्सल शेगावची कचोरी तुम्हाला नागपुरात खायची झाली तर त्यासाठी एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे. झाशी राणी चौकात शेगावहून आलेली कचोरी मिळत आहे. थेट शेगावमध्ये तयार केलेली कचोरी नागपुरात     तळून गरमागरम खाण्यासाठी दिली जाते. नाष्ट्याला अनेक पर्याय उपलब्ध असतात. मात्र, प्रत्येक शहराची जशी एक आपली खास ओळख आणि वैशिष्ट्य असतात, तशीच ओळख शेगावची कचोरीने जपली आहे. वर्षाकाठी लाखो भाविक गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला जातात. सोबतच इथल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळे प्रख्यात असलेल्या कचोरीचा आस्वाद देखील घेतात. सर्वत्र देशभर लौकिक पसरलेल्या शेगावच्या काचोरीची अस्सल चव नागपुरात घेण्यासाठी एक उत्तम पर्याय शेगावच्या कचोरी दुकानाच्या रूपाने नागपूरकरांना उपलब्ध झाला आहे. अल्पावधीतच चांगला प्रतिसाद नागपुरातील झाशी राणी चौक येथे 2016 साली नागपूरकरांना कचोरीची चव घेता यावी यासाठी दुकान सुरू केलं. अल्पावधीतच लोकांचा चांगला प्रतिसाद लाभला. यामागील मुख्य उद्देश असा की, बाजारात अनेक शेगावच्या कचोरीच्या नावाने कुठलीही कचोरी विकली जाते. मात्र, अस्सल कचोरीची चव घेता यावी यासाठी आम्ही हे दुकान सुरू केले. Video : नोकरी सोडून सुरू केला व्यवसाय, सरकारी पाठबळावर लाखोंची कमाई! कचोरीचे वैशिष्ट्य  कचोरीचे वैशिष्ट्य असे की, यासाठी लागणारी कचोरी कच्चा स्वरूपात थेट शेगाव वरून दररोज येते. ग्राहकांना मागणीनुसार गरमागरम शुद्ध तेलात तळून ती सर्व्ह केली जाते. याचसोबत ही कच्च्या स्वरूपात पॅकेटमध्ये सुद्धा विकली जाते. एक पॅकेट 120 रुपयाला उपलब्ध आहे. अस्सल चव आणि स्वच्छता हा आमचा मुख्य हेतू असून आमच्या दुकानातील कचोरीच्या चवीमुळे लोक समाधान आणि आनंद व्यक्त करतात. जुन्या गाण्यांसोबत घ्या कोल्हापुरी भडंगचा आस्वाद, पाहा Video 800 प्लेटची विक्री  कचोरीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात वापरण्यात येणारा  मसाला हा फार कमी असतो. तेलकटपणा देखील कमी असतो. कचोरी मिरची सोबत लोक आवडीने खातात. दिवसाला आम्ही सातशे ते आठशे प्लेट कचोरी विकतो, अशी माहिती शेगाव कचोरी सेंटरचे मालक पद्मनाम बुटी यांनी दिली.  

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात