बायकोच्या जाचाला कंटाळून सोडली गलेलठ्ठ पगाराची नोकरी, ड्रायव्हर म्हणून करतोय काम

बायकोच्या जाचाला कंटाळून सोडली गलेलठ्ठ पगाराची नोकरी, ड्रायव्हर म्हणून करतोय काम

पत्नीसोबतच्या रोज होणाऱ्या भांडणाला कंटाळून पतीने आपल्या मल्टीनॅशनल कंपनीतील चांगल्या हुद्द्यावरची नोकरी सोडली आणि घरातून निघून गेला.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर : घरोघरी मातीच्या चुली म्हणतात तसंच पती-पत्नीमध्ये होणारे वाद हे प्रत्येक घरी असतात. काही जण ते आपापसात मिटवतात तर काही जण वैतागून विषय सोडून देतात पण पती-पत्नीमधला हा वाद आटोक्यात आलाच नाही किंवा सहन होण्यापलीकडे गेला की मग काय होतं याचं धक्कादायक एक उदाहरण समोर आलं आहे. पत्नीसोबतच्या रोज होणाऱ्या भांडणाला कंटाळून पतीने आपल्या मल्टीनॅशनल कंपनीतील चांगल्या हुद्द्यावरची नोकरी सोडली आणि घरातून निघून गेला. पत्नीचा त्रास नको म्हणून या व्यक्तीनं MNC मधील चांगल्या पगाराची नोकरी सोडून घराबाहेर राहता यावं म्हणून ड्रायव्हरची नोकरी स्वीकारली आहे. ही घटना दिल्लीतील असल्याची माहिती मिळाली आहे.

ही धक्कादायक बाब जेव्हा पत्नी न्यायालयात गेली आणि पोलिसांसमोर ही गोष्ट आली तेव्हा हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. धक्कादायक कारण ऐकून सगळेच अवाक झाले होते. 35 वर्षीय एका व्यक्तीनं रोजच्या पत्नीसोबतच्या भांडणाला वैतागून गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून ड्रायव्हरची नोकरी स्वीकारली. यासाठी तो परस्पर हरियाणाला निघून गेला आणि घरच्यांना याबााबत कोणतीही माहिती दिली नाही.

या व्यक्तीची पत्नी जेव्हा न्यायालयात गेली तेव्हा हा व्यक्ती पुन्हा घरी परतला आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, 35 वर्षीय व्यक्ती मंगळवारी आपल्या कुटुंबात परतला आहे. गुन्हे शाखेच्या उपायुक्त मोनिका भारद्वाज यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी त्यांच्या लग्नाला 10 वर्षे झाली. पती पुन्हा घरातून पळून जाऊ नये म्हणून त्यांनी दोघांचंही समुपदेशन केलं आहे.

हे वाचा-आंबे काढण्याच्या घळानं लंपास केले मोबाईल, पाहा मुंबई उपनगरातील चोरीचा VIDEO

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी 12 एप्रिलपर्यंत दोघंही गुण्यागोविंदानं राहात होते. या व्यक्तीचा पगार देखील 25000 आसपास महिना होता. हळूहळू त्यांच्यात वाद होऊ लागले आणि रोजचचं भांडण झालं. रोजच्या भांडणाला वैतागून अखेर पतीनं नोकरी आणि घर सोडण्याच्या निर्णय घेतला. या 35 वर्षांचा व्यक्ती हरियाणातील मेवान इथे ड्रायव्हर म्हणून काम करू लागला.

इकडे आपला पती बरेच दिवस घरी न आल्यानं चिंतेत असलेल्या पत्नीनं पोलिसात धाव घेतली आणि घडलेला प्रकार पोलिसांच्या कानावर घातला. आपला पती हरवल्याची तक्रार दाखल केली. पती गायब होण्यामागे खास मित्राचा हात असल्याचा संशय असल्यानं तिने कोर्टात न्याय मागण्याचा निर्णय़ घेतला ही बातमी पतीपर्यंत पोहोचताच 35 वर्षीय व्यक्ती घरी परत आला आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 27, 2020, 12:14 PM IST
Tags: delhi

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading