Home /News /maharashtra /

सोलापुरात मुलाचं आईसोबत राक्षसी कृत्य; झोपलेल्या जागीच डोक्यात घातला दगड अन्...

सोलापुरात मुलाचं आईसोबत राक्षसी कृत्य; झोपलेल्या जागीच डोक्यात घातला दगड अन्...

Murder in Solapur: सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे एक हृदय हेलावणारी घटना समोर आली आहे. येथील एका युवकाने आपल्या जन्मदात्या आईची झोपलेल्या जागीच निर्घृण हत्या (son killed Mother) केली आहे.

    सोलापूर, 13 ऑक्टोबर: सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बार्शी (Barshi) येथे एक हृदय हेलावणारी घटना समोर आली आहे. येथील एका युवकाने आपल्या जन्मदात्या आईची झोपलेल्या जागीच निर्घृण हत्या (Brutal murder) केली आहे. आरोपी तरुणाने आपल्या झोपलेल्या आईच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या (crushed head with stone) केली आहे. एवढंच नव्हे तर आरोपीनं पुरावा नष्ट करण्यासाठी आईला गादीवरून ओढत नेत, घराजवळील एका झुडपात मृतदेह टाकला आहे. नात्याला काळीमा फासणारी ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा  पुढील तपास पोलीस करत आहेत. रुक्मिणी नागनाथ फावडे (वय-45) असं हत्या झालेल्या महिलेचं नाव असून त्या बार्शी शहरातली वाणी प्लॉट परिसरातील रहिवासी होत्या. तर श्रीराम नागनाथ फावडे असं गुन्हा दाखल झालेल्या 21 वर्षीय आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रुक्मिणी आणि त्यांचा मोठा मुलगा श्रीराम दोघंही बार्शी शहरातली वाणी प्लॉट परिसरातील शिंदे यांच्या घरी वास्तव्याला होते. कौटुंबीक वादामुळे लहान मुलगा आणि पती हे बार्शी शहरात डंबरे गल्ली येथे राहत होते. हेही वाचा-देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; कार अपघतात तिघांचा मृत्यू मोठा मुलगा श्रीराम आणि रुक्मिणी यांच्यात नेहमी पैशावरून वाद व्हायचा. याच वादातून आरोपीनं आपल्या आईची हत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आहे. संशयित आरोपीनं यापूर्वी देखील आपल्या आईला आणि लहान भावाला मारहाण केली होती. याप्रकरणी पोलिसांनी मृत महिलेचे पती आणि लहान भावाकडे चौकशी केली असता, आरोपी मुलगा मुंबईला गेल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीनं मुंबईला जात असल्याचं व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवलं होतं. हेही वाचा-बदनामी टाळण्यासाठी गॅलरीत लपायला गेली अन्...; इमारतीवरून पडून महिलेचा मृत्यू आरोपीनं आईची हत्या केल्यानंतर, घरातील सर्व वापरते कपडे घेऊन मुंबईला गेल्याचं समोर आलं आहे. हत्या केल्यानंतर तीन दिवसांनी हे प्रकरण समोर आलं आहे. याप्रकरणी बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीला अटक करण्यासाठी एक पोलीस पथक मुंबईला रवाना झालं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Murder Mystery, Solapur

    पुढील बातम्या