मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /आईला का मारलं, मुलाने बापावर कोयत्याने केले सपासप वार, बीड हादरलं!

आईला का मारलं, मुलाने बापावर कोयत्याने केले सपासप वार, बीड हादरलं!

Murder In Beed: दारू पिऊन आईला शिवीगाळ आणि मारहाण (father abused and beat his mother) केल्याप्रकरणी मुलानं धारदार कोयत्यानं वडिलांची हत्या (son killed father) केली आहे.

Murder In Beed: दारू पिऊन आईला शिवीगाळ आणि मारहाण (father abused and beat his mother) केल्याप्रकरणी मुलानं धारदार कोयत्यानं वडिलांची हत्या (son killed father) केली आहे.

Murder In Beed: दारू पिऊन आईला शिवीगाळ आणि मारहाण (father abused and beat his mother) केल्याप्रकरणी मुलानं धारदार कोयत्यानं वडिलांची हत्या (son killed father) केली आहे.

बीड, 26 मे: गेल्या आठवड्यात आष्टी याठिकाणी आईला दारू पिऊन शिवीगाळ करणाऱ्या वडिलांची गोळी घालून हत्या केल्याची घटना ताजी असताना, बीड (Beed) जिल्ह्यातील पिंपळनेर (Pimpalner) याठिकाणाहून अशीच एक घटना समोर आली आहे. दारू पिऊन आईला शिवीगाळ आणि मारहाण (father abused and beat his mother) केल्याप्रकरणी मुलानं धारदार कोयत्यानं वडिलांची हत्या (son killed father) केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

संबंधित हत्या झालेल्या 60 वर्षीय वडिलांचं नाव श्रीकिसन अंबादास तागड असं आहे. बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील रहिवासी असणाऱ्या मृत श्रीकिसन यांना दारुचं व्यसन होतं. मागील काही वर्षांपासून ते व्यसनाच्या आहारी गेले होते. दारू पिऊन घरी आल्यानंतर ते सतत आईला शिवीगाळ आणि मारहाण करत असतं. सोमवारी सायंकाळीही त्यांनी पत्नीशी वाद घातला. आईला होणारी शिवीगाळ आणि मारहाण पाहून आरोपी मुलगा लहू दोघांच्या भांडणात पडला. यावेळी बापलेकामध्येही भांडणं झाली.

पण घरातील वादावादीनंतर वडील श्रीकिसन शेतात निघून गेले. बराच वेळ झाल्यानंतरही वडील शेतातून परत आले नाहीत. त्यामुळे त्यांना शोधण्यासाठी लहूही शेतात गेला. पण शेतात गेल्यानंतर बापलेकात पुन्हा वाद झाला. यावेळी राग अनावर झाल्याने आरोपी मुलगा लहूने हातातील कोयत्यानं वडिलांवर सपासप वार केले. या हल्ल्यात वडिलांचा जागीच मृत्यू झाला.

हे ही वाचा-Aurangabad : बायकोची मैत्रीण बनली प्रेयसी, अडथळा दूर करण्यासाठी काढला पतीचा काटा

या घटनेची माहिती मिळताचं उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके, पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षत शरद भुतेकर यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून मृत श्रीकिसन यांचे भाऊ रोहिदास तागड यांच्या तक्रारीवरून मुलगा लहुविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलगा लहुला अटक केली असून या घटनेची पुढील कार्यवाही केली जात आहे.

First published:

Tags: Beed, Crime news, Father, Murder