मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

इंधन दरवाढीवर बाबा रामदेव म्हणाले, 'कधी तरी स्वप्न पूर्ण होईल' VIDEO

इंधन दरवाढीवर बाबा रामदेव म्हणाले, 'कधी तरी स्वप्न पूर्ण होईल' VIDEO

आता सरकारपुढे अनेक आर्थिक संकटं आहे, देशहिताचे कार्य सुरू ठेवायचे आहे. सामाजिक कार्य सुरू ठेवायचे आहे.

आता सरकारपुढे अनेक आर्थिक संकटं आहे, देशहिताचे कार्य सुरू ठेवायचे आहे. सामाजिक कार्य सुरू ठेवायचे आहे.

आता सरकारपुढे अनेक आर्थिक संकटं आहे, देशहिताचे कार्य सुरू ठेवायचे आहे. सामाजिक कार्य सुरू ठेवायचे आहे.

नागपूर, 23 ऑक्टोबर : देशभरात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर (petrol and diesel price hike) गगनाला भिडले आहे. 'मी त्यावेळी म्हटलं होतं की काळा पैसा परत आला तर इंधनाचे दर कमी होतील. पण सरकारला आता अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी आणि राष्ट्रहिताचे काम करावे लागत आहे, त्यामुळे कधी तरी स्वप्न पूर्ण होईल', असं वक्तव्य बाबा रामदेव (baba ramdev) यांनी केलं आहे.

बाबा रामदेव आज नागपूरमध्ये आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना बाबा रामदेव यांनी आपली भूमिका मांडली.

'काळा पैसा परत आल्यावर पेट्रोलचे दर 30 रुपये होईल असं तुम्ही म्हणाला होता, पण आता दर वाढत आहे त्यामुळे देशात काळापैसा वाढलाय का? असा सवाल पत्रकारांनी विचारला असता बाबा रामदेव म्हणाले की, मी ज्यावेळी काळापैशांविरोधात देशभरात आंदोलन केलं होतं. त्यावेळी मी काही पर्याय ठेवले होते. कर चुकवणारे असतील किंवा काळापैसा साठवला असेल तर त्यावेळी मी म्हणालो होतो की, जो क्रुड इंधनाचा दर आहे, त्यानुसार जर इंधन विकले आणि कर कमी केला तर 30 रुपयांमध्ये पेट्रोल विकणे शक्य होते. पण आता सरकारपुढे अनेक आर्थिक संकटं आहे, देशहिताचे कार्य सुरू ठेवायचे आहे. सामाजिक कार्य सुरू ठेवायचे आहे. सरकार सुद्धा चालवायचे आहे, त्यामुळे कधी ना कधी तरी स्वप्न हे पूर्ण होईल'.

Apple : LCD डिस्प्लेसह iPhone SE3 होणार लाँन्च; पाहा काय आहेत फीचर्स

तसंच, बॉलिवूडमध्ये ज्या प्रकारे नशेबाजीचे विनाशकारी तंत्र सुरू आहे. ते भारताच्या तरुण पिढीसाठी घातक आहे.  बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना आपण रोल मॉडेल मानतो. त्यामुळे अनेक तरुण त्यांचं अनुकरण करत असतात. त्यामुळे बॉलिवूडमधील लोकांनाच अंमली पदार्थाचा कचरा साफ करायला हवा नाही तर ते त्यांच्यासाठीच आत्मघाती ठरेल, असा सल्लाही बाबा रामदेव यांनी दिला.

'भारत आणि पाकिस्तान सामना उद्या होणार आहे. या परिस्थिती भारत पाकिस्तान असा सामना होणे हे देश हितासाठी योग्य नाही. क्रिकेटचा खेळ आणि दहशतवाद एकत्र चालू शकत नाही', असंही बाबा रामदेव म्हणाले.

First published:

Tags: Baba ramdev, Petrol price hike