जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / जुळ्या बहिणींशी लग्न करून अडचणीत आला; आता महिला आयोगानेही घेतली दखल, पोलिसांना दिले हे निर्देश

जुळ्या बहिणींशी लग्न करून अडचणीत आला; आता महिला आयोगानेही घेतली दखल, पोलिसांना दिले हे निर्देश

जुळ्या बहिणींशी लग्न करून अडचणीत आला; आता महिला आयोगानेही घेतली दखल, पोलिसांना दिले हे निर्देश

या प्रकाराची त्वरित चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सोलापूर पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.

  • -MIN READ Solapur,Maharashtra
  • Last Updated :

सोलापूर 05 डिसेंबर : सोलापुरातील एक लग्न सध्या चांगलंच चर्चेत आहे. यात दोन उच्चशिक्षित जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी विवाह केला आहे. या दोन्ही जुळ्या बहिणी कांदिवलीतील असून त्यांनी टॅक्सी ट्रॅव्हलची एजन्सी असलेल्या तरुणाशी विवाह केला आहे. मात्र, आता या प्रकरणाला वेगळंच वळण आलं आहे. आता या लग्नाची दखल थेट महिला आयोगानेही घेतली आहे. आधी दोन तरुणींसोबत लग्न केल्याने या प्रकरणातील नवरदेव अतुल याच्यावर अकलूज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. भा.द.वि कलम 494 प्रमाणे नवरदेवावर गुन्हा दाखल करण्यात आला. माळेवाडीमधील राहुल फुले यांनी ही फिर्याद दिली. यानंतर आता महिला आयोगानेही याप्रकरणी पोलिसांना पत्र पाठवलं आहे. या प्रकाराची त्वरित चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सोलापूर पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. सोलापुरातील त्या लग्नाला वेगळंच वळण; जुळ्या बहिणींशी विवाह करणं तरुणाला भोवणार? पोलिसांत पोहोचलं प्रकरण सोलापूरच्या पोलीस अधिकक्षकांना टॅग करुन रुपाली चाणकर आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या, की ‘सोलापूर येथील एका तरुणाने मुंबईतील जुळ्या बहिणींशी एकाच मांडवात लग्न केले आहे. ह्या लग्नाची सोशल मीडियातून सर्वत्र चर्चा सुरू आहे. तसेच माध्यमातून ह्या लग्नाच्या बातम्या सुरु आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम 494प्रमाणे हा गुन्हा आहे. तरी सोलापुर पोलीस अधिक्षक आपण उपरोक्त बाबत चौकशी करून त्वरीत कायदेशीर कारवाई करावी. तसेच केलेल्या कारवाई बाबतचा अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम १९९३ चे कलम १२ (१) व १२ (२) अन्वये तात्काळ सादर करावा’

जाहिरात

यामुळे दोघींनी केलं एकाच तरुणासोबत लग्न - दोन्ही जुळ्या बहिणींपैकी एकीचे या तरुणावर प्रेम जडले. त्यानंतर नातेवाईकांच्या परवानगीने दोघींनी त्याच्याशी एकाच मांडवात लग्न केलं. पिंकी आणि रिंकी या दोघी जुळ्या बहिणी आयटी इंजिनिअर असून एकाच कंपनीत काम करतात. तर त्यांनी विवाह केलेला तरुण अतुल हा अंधेरीत राहतो. पिंकी रिंकी आणि अतुलच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत हॉटेल गलांडे इथं मोठ्या थाटामाटात विवाह पार पडला. VIDEO: एक वर अन् 2 वधू; जुळ्या बहिणींची एकाच तरुणासोबत सप्तपदी, सोलापूरकर शॉक! पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणी असून त्यांच्या सवयीसुद्धा एकसारख्या आहेत. इतकंच काय तर एकीला त्रास झाल्याच तो दुसरीलासुद्धा जाणवतो. याशिवाय त्यांची आवडन निवडही एकच आहे. सहा महिन्यांपूर्वी पिंकी रिंकीच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पिंकी आणि रिंकीच्या घरी इतर कोणी पुरुष नसल्याने तेव्हा अतुलने त्यांच्या आईची काळजी घेण्यासाठी मोठी मदत केली. तेव्हा दोघींपैकी एकीचे अतुलवर प्रेम जडले. पण दोघी वेगळ्या राहू शकत नसल्याने दोघींनीही त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात