मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सोलापुरातील त्या लग्नाला वेगळंच वळण; जुळ्या बहिणींशी विवाह करणं तरुणाला भोवणार? पोलिसांत पोहोचलं प्रकरण

सोलापुरातील त्या लग्नाला वेगळंच वळण; जुळ्या बहिणींशी विवाह करणं तरुणाला भोवणार? पोलिसांत पोहोचलं प्रकरण

दोन उच्चशिक्षित जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी विवाह केला आहे. हे प्रकरण चर्चेत असतानाच आता नवरदेव मात्र अडचणीत येऊ शकतो. कारण या नवरदेवाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur, India

सोलापूर 04 डिसेंबर : दोन उच्चशिक्षित जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी विवाह केला आहे. या विवाहाची चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे. या दोन्ही जुळ्या बहिणी कांदिवलीतील असून त्यांनी टॅक्सी ट्रॅव्हलची एजन्सी असलेल्या तरुणाशी विवाह केला आहे. हे प्रकरण चर्चेत असतानाच आता नवरदेव मात्र अडचणीत येऊ शकतो. कारण या नवरदेवाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

VIDEO: एक वर अन् 2 वधू; जुळ्या बहिणींची एकाच तरुणासोबत सप्तपदी, सोलापूरकर शॉक!

या प्रकरणातील नवरदेव अतुल याच्यावर अकलूज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भा.द.वि कलम 494 प्रमाणे नवरदेवावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माळेवाडीमधील राहुल फुले यांनी ही फिर्याद दिली. यानंतर नवरदेव अतुल उत्तम आवतडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती किंवा पत्नी जिवंत असताना किंवा घटस्फोट न घेता पुनर्विवाह करणे हा IPC च्या कलम-494 अंतर्गत गुन्हा मानला जातो. यामध्ये गुन्हेगाराला 7 वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

यामुळे दोघींनी केलं एकाच तरुणासोबत लग्न -

दोन्ही जुळ्या बहिणींपैकी एकीचे या तरुणावर प्रेम जडले. त्यानंतर नातेवाईकांच्या परवानगीने दोघींनी त्याच्याशी एकाच मांडवात लग्न केलं. पिंकी आणि रिंकी या दोघी जुळ्या बहिणी आयटी इंजिनिअर असून एकाच कंपनीत काम करतात. तर त्यांनी विवाह केलेला तरुण अतुल हा अंधेरीत राहतो. पिंकी रिंकी आणि अतुलच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत हॉटेल गलांडे इथं मोठ्या थाटामाटात विवाह पार पडला.

Shocking! नवरदेवाला वरमाळा घालताच भयानक घडलं; लखनऊमध्ये नवरीचा स्टेजवरच मृत्यू

पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणी असून त्यांच्या सवयीसुद्धा एकसारख्या आहेत. इतकंच काय तर एकीला त्रास झाल्याच तो दुसरीलासुद्धा जाणवतो. याशिवाय त्यांची आवडन निवडही एकच आहे. सहा महिन्यांपूर्वी पिंकी रिंकीच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पिंकी आणि रिंकीच्या घरी इतर कोणी पुरुष नसल्याने तेव्हा अतुलने त्यांच्या आईची काळजी घेण्यासाठी मोठी मदत केली. तेव्हा दोघींपैकी एकीचे अतुलवर प्रेम जडले. पण दोघी वेगळ्या राहू शकत नसल्याने दोघींनीही त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

First published: